Maldives Latest News Marathi: आम्हाला धमकावण्याचा परवाना कोणाकडे नाही!
भारत आणि मालदीव यांचे संबंध बिघडत असताना आता पुन्हा याच्यामध्ये एक नवीन वाद निर्माण झालेला आहे. काही दिवसापूर्वी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दोऱ्यावर असताना मालदीव या देशातील नेत्यांनी भारतातील नेत्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आलोचना केली होती. याला प्रतिकार म्हणून भारतातील नागरिकांनी बॉयकॉट मालदीव असा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला होता आणि याचा परिणाम मालदीव देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला.
याचा परिणाम म्हणून मालदीव देशाचे पंतप्रधान “Muizzu” चीन या देशाकडे मदत मागण्यासाठी गेले होते. आता चर्चेला नवीन विषय म्हणजे चीनच्या देशाच्या दोरा करून येतच Muizzu यांनी एअरपोर्टवर वादग्रस्त विधान केलेले आहे. (ते म्हटले की मालदीव हा छोटासा देश असला तरी त्याला कोणीही बुल्ली करू शकत नाही म्हणजे त्रास देऊ शकत नाही)
मालदीव देश माहिती: Maldives Country Information in Marathi
मालदीव या देशाला भारतात पासून दूर जायचे आहे त्यामुळे तो चीन या देशाचा सहारा शोधत आहे. येणाऱ्या काळामध्ये मालदीव हा देश भारतापासून आयात होणाऱ्या सर्वच गोष्टीवर निर्बंध लावू शकतो आणि याचा परिणाम मालदीव देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो आणि तेथील सामान्य जनतेवर देखील होऊ शकतो.
मालदीव हा देश भारताकडून सर्वात मोठ्या प्रमाणात औषधे विकत घेणारा देश आहे. येणाऱ्या काळामध्ये औषधांवर देखील निर्बंध लावण्यात येईल असे संकेत दिसत आहे. असे धोरण स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे मालदीव या देशाला चीन या देशाकडून आर्थिक सहकार्य पाहिजेल आहे.
भारत आणि मालदीव देशाचे व्यापारी संबंध खूप वर्ष जुनी आहे. भारत आणि मालदीव या देशाचा ट्रेड 500 मिलियन पेक्षा जास्त आहे आणि यामध्ये फार्मासिटिकल वस्तूंचे प्रमाण जास्त आहे.
अशातच जर मालदीवने फार्मासिटिकल या वस्तूंवर निर्बंध लागली तर मालदीवच्या देशातील सामान्य लोकांचे हाल होतील. तसेच मेडिकल सहाय्यता घेण्यासाठी मालदीवचे लोक भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येतात.
मालदीव या देशांमध्ये कोणत्याही प्रकारची मेडिकल सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना भारतासारख्या देशावर अवलंबून राहावे लागते. अशातच जर मालदीवने भारताबरोबर सगळे ट्रेड संबंध तोडलेले तर तेथील सामान्य जनतेला याचे नुकसान सहन करावे लागू शकते.
सध्या भारत आणि मालदीव देशाचे संबंध नाजूक मोडवर आहे त्यामुळे आता भविष्यामध्ये दोन्ही देशांवर कशाप्रकारे परिणाम होईल यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.