खंडग्रास सूर्यग्रहण 2022: Khandagras Surya Grahan Information in Marathi

खंडग्रास सूर्यग्रहण 2022: Khandagras Surya Grahan (Khandagras Solar Eclipse Information in Marathi #suryagrahan2022

Khandagras Surya Grahan 2022: Information in Marathi

Khandagras Solar Eclipse2022: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण कार्तिक अमावस्या दिनांक 25 ऑक्टोंबर 2022 रोजी होत आहे.

सूर्यग्रहण हे एक भौगोलिक घटना आहे जी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने घडते.

Surya Grahan 2022: October Time & Date

Surya Grahan 2022 Marathi: भारतातील सूर्यग्रहणाचा स्पर्शकाल संध्याकाळी 4:29 पासून सुरु होईल ग्रहणाचा मध्य कालावधी 5:32 असेल आणि मोक्ष 5:57 वाजता सुरू होईल. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य होणार नाही. उत्तरखंड आणि जम्मू कश्मीर आणि लेह लडाख मधून हे खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल.

खंडग्रास अर्थ अशी व्यवस्था आहे जेव्हा ग्रहण फक्त सूर्य किंवा चंद्राच्या काही भागावर होते म्हणजे चंद्र सूर्याचा फक्त एक भाग व्यापतो या स्थितीला खंडग्रास म्हणतात तर संपूर्ण भाग झाकण्याच्या स्थितीला खग्रास ग्रहण म्हणतात.

जेव्हा सूर्य अर्धवट किंवा पूर्ण चंद्राने झाकलेला असतो तेव्हा सूर्यग्रहण होते. शस्त्रज्ञांच्या मते पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा काही काळ सूर्याचा प्रकाश झाकला जातो या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.

सोप्या अर्थात सांगायचं झाले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यावर सूर्यग्रहण होते आणि जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये ते तेव्हा चंद्रग्रहण होते.

खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?

पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकलेला जातो त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. एरवीस चंद्र सूर्यापेक्षा अगदी पृथ्वीपेक्षाही खूप लहान आहे पण तो पृथ्वीपासून जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाराने एकसारखे दिसतात आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्रबिंब सूर्यबिंब ला पूर्णपणे झाकून टाकते.

खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?

खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय सूर्याचा केवळ काही भाग झालेला दिसतो त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण केव्हा होते?

पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काही क्षण लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरचा बिंदू जवळ असतो अशावेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो याच दरम्यानचे व सूर्यग्रहण होते. तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडी सारखी सूर्याची कडा दिसून येते यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोल प्रेमींनी रिंग ऑफ फायर (Ring of Fire) अग्निवल्य, अग्निकंकण अशी नावे दिलेली आहे.

सूर्यग्रहण कधी होते?

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते. चंद्रामुळे सूर्याकडून येणार प्रकाश अडवतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते याला सूर्यग्रहण म्हणतात. चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाची खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती स्थिती दिसते.

चंद्रग्रहण कधी होते?

जर सूर्य आणि चंद्रामध्ये पृथ्वी आली तर चंद्रग्रहण होते. पृथ्वीमुळे चंद्राकडे जाणारा सूर्यप्रकाश रोखला जातो पृथ्वीवरची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला ग्रहण दिसते.

खग्रास सूर्यग्रहण कालावधी?

खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 1 तास 42 मिनिटे असू शकतो.

ग्रहण किती वेळा होते?

एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाच वेळा सूर्यग्रहण पाहता येतात त्यातला एखादा दुसरा खग्रास ग्रहण असतं आणि तेही सगळ्याच देशातून दिसत नाही आणि कंकणाकृती सूर्यग्रहण पाण्याची संधी खूपच दुर्मिळ असते.

ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?

ग्रहण पाहताना कधीही सूर्य कडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र किरणामुळे डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. ग्रहण पाहण्यासारखे काही खास फिल्टर चष्मे लावून ग्रहण पहावे पिन होल कॅमेरा घरातील चाळणी किंवा सौर्य दुर्बिनच्या माध्यमातून सूर्याचे प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते.

Khandagras Surya Grahan 2022: Information in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon