आकाशातील दोन नवीन तारे कोणते आहेत? | Jupiter and Venus Conjunction 2023

आकाशातील दोन नवीन तारे कोणते आहेत? | Jupiter and Venus Conjunction 2023

आकाशातील दोन नवीन तारे कोणते आहेत? – New Star in Sky 2023 Marathi

मित्रांनो, जर तुम्ही सध्या आकाशामध्ये पाहायला तर तुम्हाला चंद्राच्या वर खाली दोन नवीन तारे दिसतील या ताऱ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की हे तारे नक्की कोणते आहेत?

2 मार्च रोजी एक वेगळी घटना अवकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ही घटना आपल्याला 2 मार्च रोजी पाहायला मिळेल असे तज्ञांनी सांगितले आहे. या दिवशी अवकाशामध्ये “शुक्र आणि गुरु” ग्रह यांचे संयोग (Conjunction) आपल्याला पाहायला मिळणार आहे. वर्ष 2023 च्या सुरुवातीला ही पहिली घटना असेल.

प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडिया (Planetary Society of India) ने सोमवारी सांगितले की अवकाशामध्ये दोन चमकणारे ग्रह शुक्र आणि गुरु 2 मार्चच्या रात्री एकमेकांच्या खूप जवळ येतील.

ही घटना 26 वर्षानंतर घडणार आहे असे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. शुक्र ग्रह हा पृथ्वीपासून 21 करोड किलोमीटर अंतरावर चमकणारा ग्रह आहे. गुरु ग्रह हा पृथ्वीपासून 85 करोड किलोमीटर दूर असलेला ग्रह आहे. हे ग्रह 2 मार्च 2023 रोजी एकमेकांच्या जवळ येणार आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा