जागतिक पर्यावरण दिन मराठी भाषण

जागतिक पर्यावरण दिन मराठी भाषण

नमस्कार मित्रांनो, या इन्फॉर्मशन मराठी या वेबसाइटवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, आज आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच विश्व पर्यावरण दिनाविषयी माहिती घेणार आहोत, या लेखात आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा महाविद्यालयात भाषण कसे करायचे याची माहिती घेणार आहोत.

जागतिक पर्यावरण दिनाचा एक भाग म्हणून दरवर्षी शाळा महाविद्यालयात भाषण स्पर्धा आयोजित केली जाते. तुम्हाला पर्यावरणावर मोजक्या शब्दात भाषण द्यायचे असते. आज आपण पर्यावरण दिन 2023 वर भाषण कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

हा लेख इयत्ता 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी योग्य असेल.

जागतिक पर्यावरण दिनाचे मराठी भाषण कसे करावे?

आदरणीय
महोदय, शिक्षक आणि माझे मित्र मैत्रणींनो…

आज आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो.

आजच्या वेगवान जगामध्ये आपल्या ग्रहाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे आणि त्याला प्राधान्य देणे हे आपले महत्त्वाचे उद्दिष्ट असणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये माणसाने प्रगती केली आहे आणि या प्रगतीमध्ये पर्यावरणाचा हास झालेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आलेले आहे. दिवस वाढत चाललेली लोकसंख्या आणि लोकसंख्या साठी लागणारी अन्नाची कमतरता या सर्वांमुळेच पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे पर्यावरण विषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आहे. आपण कशाप्रकारे पर्यावरणाचा हास करत आहे आणि त्यामुळे पर्यावरणावर कोणते परिणाम होत आहे याविषयी जनजागृती करणे हा जागतिक पर्यावरणाचा मुख्य उद्देश आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो पर्यावरण विषयी समस्या बद्दल जागृत वाढवण्यासाठी अनेक जागतिक कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची स्थापना केली. व्यक्ती समुदाय आणि सरकारांना एकत्र येण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणासमोरील महत्त्वाच्या अवनांना तोंड देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून जागतिक पर्यावरण दिन काम करते. हा दिवस सकारात्मक बदलासाठी समर्थन करण्याची, शाश्वत पद्धतीचा प्रचार करण्याचे आणि निसर्गाचे सौंदर्य आणि विविधता साजरे करण्याची संधी देखील प्रदान करते. जागतिक पर्यावरण दिनाच्या प्राथमिक उद्दिष्ट पैकी एक म्हणजे व्यक्तीमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे. तसेच जागरूकता वाढून लोकांना त्यांच्या कृतीचा पर्यावरणावर होणारा परिणामाबद्दल शिक्षित करून पर्यावरणाविषयी सकारात्मक बदलासाठी प्रेरित करणे आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचा दुसरा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना कचरा कमी करणे, ऊर्जा वाचवणे आणि पर्यावरणपूरक उत्पादने वापरणे यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आहे. आपल्या ग्रहाचे दीर्घकालीन संरक्षण सुरक्षित करण्यासाठी तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे त्यांना शैक्षणिक गोष्टी शिकवणे आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण शिक्षण देऊन आपण भावी पिढींना पर्यावरणाविषयी जागृत करू शकतो.

पर्यावरणाचे आपल्या ग्रहावर होणारे परिणाम:

हवामान बदल हवामानात बदल झाल्यामुळे आपल्या ग्रहामध्ये मोठे बदल होत आहेत जसे की तापमान वाढत आहे, पाऊस कधीही पडत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होत आहे. हे सत्र असे चालू राहिले तर लवकरच आपल्या पर्यावरणाचा हास होईल. त्यामुळे पृथ्वीवर मानवी जीवन संपुष्टात येईल. हवामानात बदल झाल्यामुळे अनैसर्गिक आपत्ती येत आहे त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे नुकसान होत आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मला भाषणाची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

जय हिंद जय भारत

जागतिक पर्यावरण दिन मराठी भाषण

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon