How to Study Share Market in Marathi

How to Study Share Market in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण शेअर मार्केटचा अभ्यास कसा करावा? याविषयी माहिती जाणून घेत आहोत. शेअर मार्केट हे खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया असल्यामुळे यामध्ये निवेश करताना जोखीम घेणे फार महत्त्वाचे आहे. शेअर मार्केट वर खाली जात असते त्यामुळे त्याला समजणे फार कठीण आहे पण अवघड नाही. शेअर मार्केटमध्ये निवेश करून लोक कोट्यावधी रुपये कमवत आहेत. शेअर मार्केट मधून नफा कमवणे सध्या खूपच सोपे झालेले आहे यासाठी बाजारामध्ये भरपूर ॲप देखील आहे याची माहिती आपण मागील आर्टिकल मध्ये दिली होती. शेअर मार्केटचा अभ्यास करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या तुम्ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर सुरुवात करूया ‘शेअर मार्केटचा अभ्यास कसा करावा?’ याविषयी थोडीशी माहिती.

How to Study Share Market in Marathi

शेअर मार्केटचा अभ्यास कसा करावा?
जर तुम्हाला ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण तुम्हाला माहिती नाही की ते कसे केले जाते तर घाबरू नका आम्ही आहोत ना! आम्ही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ए टू झेड (A to Z) गोष्ट सांगण्यास तयार आहोत. शेअर मार्केट हे गुंतागुंतीची जटिल प्रक्रिया असली तरी यामध्ये निवेश करणे फार सोपे आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनातला काही व्यस्त वेळ द्यावा लागेल ज्यामुळे तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय? याविषयी संपूर्ण माहिती मिळेल.

शेअर मार्केट विषयी अनेक तज्ञ तुम्हाला युट्युब वर मिळून जातील जे तुम्हाला योग्य प्रकारे शेअर मार्केटमध्ये निवेश कसे करावे शेअर मार्केटमध्ये निवेश करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत याविषयी माहिती सांगतात. पण आज आपण शेअर मार्केट मधील बेसिक गोष्टी विषयी माहिती जाणून घेणार आहोत जी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये निवेश करताना उपयोगी पडेल.

शेअर मार्केट समजून घेणे:

शेअर मार्केटमध्ये निवेश करण्यापूर्वी शेअर मार्केट काय आहे आणि ते कशाप्रकारे काम करते याविषयी माहिती जाणून. याविषयी आपण मागच्या सत्रामध्ये माहिती मिळवली होती.

शेअर मार्केट हे जटिल प्रक्रिया असल्यामुळे याला समजणे थोडेसे कठीण आहे पण अवघड नाही. शेअर मार्केटमध्ये निवेश करण्यासाठी कंपनीचा आढावा घेणे फार महत्त्वाचे आहे. कोणती कंपनी कशाप्रकारे परफॉर्म करत आहे हे जाणून घेणे आणि त्यामध्ये अभ्यासपूर्वक निवेश करणे फार महत्त्वाचे असते. कंपनीचे शेअर केव्हा खाली जातील आणि केव्हा वरती जातील यावर सतत लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही शेअर लॉन्ग टर्म साठी घेत आहात किंवा शॉर्ट टर्म साठी हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

शेअर मार्केट ट्रेडिंगचे फायदे:

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शेअर मार्केट खूपच कमी कालावधीमध्ये जास्त नफा मिळवून देणारे साधन ठरू शकते.

शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करणे भविष्याचा निधी जमा करण्यासारखे आहे.

बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जास्त सोयीस्कर आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्याचा निधी जमा करू शकता.

शेअर मार्केटमधील धोके:

शेअर मार्केट हे जटिल आणि गुंतागुंतीचे असल्यामुळे यामध्ये धोके जास्त असते.

कारण की कोणीही मार्केटचा अंदाज लावू शकत नाही की कोणते शेअर वरती जाणार आहेत आणि कोणते शेअर खाली येणार आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक कंपनीचा आढावा घेणे आणि त्यावर सखोल संशोधन करणे महत्त्वाचे असते नाहीतर शेअर मार्केटमध्ये तोटा होण्याचे प्रमाण जास्त असते.

मार्केट एक लवचिक प्रक्रिया आहे. मार्केटमध्ये छोटीशी पण हालचाल शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आणू शकते. शेअर मार्केट व स्थानिक राजकारणी आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव पडतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

कंपनीचे विश्लेषण:

शेअर मार्केट मधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कंपनीचे विश्लेषण म्हणजेच कंपनीचे संशोधन करणे ज्याला आपण इंग्लिश मध्ये (analysis) असे म्हणतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीच्या शेअरची माहिती जाणून घेणे फार महत्त्वाचे असते जसे की दहा वर्षांपूर्वीचा कंपनीचा इतिहास पाहणे किंवा कंपनीने आतापर्यंत ग्राहकांना किती रिटर्न्स दिले आहे कंपनीत किती वेळा तोट्यामध्ये होती आणि कंपनीत सध्या कोणत्या अवस्थेत आहे याविषयी माहिती घेऊनच शेअर मार्केटमध्ये निवेश करणे फायद्याचे ठरते अन्यथा यामध्ये तोटा होण्याचे जास्त प्रमाण असते.

तुम्ही कंपनीमध्ये किती वर्षासाठी निवेश करणार आहात किंवा तुम्ही इंट्राडे करू इच्छिता तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे कारण की शेअर मार्केटमध्ये कंपनी आणि त्याचे संशोधन सर्वात महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच मग शेअर मार्केटमध्ये पैसा निवेश करावा.

ट्रेडिंग धोरण:

शेअर मार्केट मधील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही ट्रेडिंग धोरण कशाप्रकारे असतात यामध्ये दोन गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीनसाठी निवेश करता किंवा आपत्कालीनसाठी.

दीर्घकालीन निवेश म्हणजे काय? (What is long term investment)

दीर्घकाली निवेश म्हणजे तुम्ही दीर्घकाळासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात जसे की दहा वर्षासाठी वीस वर्षासाठी यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे मार्केटवर लक्ष ठेवण्याची गरज नसते एकदा का तुम्ही शेअर मध्ये आणि कंपनीमध्ये पैसा गुंतवला की यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही शेअर मार्केट आपले काम स्वतः करेल आणि तुम्हाला पैसा बनवून देईल फक्त की तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवताना कोणत्या कंपनीमध्ये गुंतवला आहे याचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. अशा दीर्घकालीन गुंतवणुकीला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असे म्हटले जाते. शेअर मार्केट मधून श्रीमंत होणारे सर्वात जास्त लोक याच धोरणाचा अवलंबन करतात.

अल्पकालीन निवेश म्हणजे काय? (What is short term investment)

अल्पकालीन निवेश म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा कमवणे आहे याला इंट्राडे देखील म्हटले जाते. कमी कालावधीमध्ये जास्त नफा कमवण्यासाठी या धोरणाचा अवलंबन केला जातो पण यामध्ये जोखीम जास्त असल्याने तुम्ही हे धोरण अवलंबन करताना एक्सपोर्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे तसेच हे धोरण स्वीकारताना मार्केटचा भरपूर अभ्यास असणे गरजेचे आहे. शेअर मार्केट मधून कमी वेळेत जास्तीत जास्त नफा कमवून देण्यासाठी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केली जाते.

लहान रकमेपासून गुंतवणूक करा:

शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी लहान रकमेपासून शेअर मार्केटमध्ये पैसा निवेश करा कारण की, छोट्या इन्वेस्टमेंट मधूनच माणूस पुढे शिकत जातो ज्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो की तो शेअर मार्केटमध्ये आपले करिअर करू शकतो किंवा पैसे बनवू शकतो. एकदाच मोठा धाडसी निर्णय घेतल्याने आणि स्टॉक मार्केट कोसळल्यामुळे मनामध्ये निराश्य निर्माण होते त्यामुळे आपण छोट्या रकमेसह शेअर मार्केटमध्ये निवेश केले पाहिजे.

शेअर मार्केट मधील महत्त्वाचे मुद्दे:

शेअर मार्केटमध्ये निवेश करण्यात आली स्वतःला विचार येणारे काही प्रश्न:

  • तुम्ही गुंतवणूक केला किती वेळ देऊ शकता.
  • आपण किती पैसे खर्च करण्यास तयार आहात.
  • इंट्राडे करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती आहे का.
  • तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला किती नफा हवा आहे.
  • बाजाराबद्दलची तुमची समज आणि त्यात होणारे सतत बद्दल याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

शेअर मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठी किती कालावधी लागतो?

शेअर मार्केट मधून पैसे कमवण्यासाठी निश्चित कालावधी किती लागेल याची कल्पना नसते पण लॉन्ग टर्म साठी शेअर विकत घेणे हे नेहमीच फायद्याचे ठरू शकते.

शेअर मार्केट मध्ये आपण किती रुपयात शेअर विकत घेऊ शकतो?

शेअर मार्केट बाजारभावानुसार बदलत असते पण तुम्ही दहा रुपयापासून शेअर विकत घेऊ शकता हे शेअर तुम्ही कंपनीच्या कामगिरीवरून आणि निरीक्षणावरून खरेदी करू शकता.

निष्कर्ष:
आशा आहे मित्रांनो तुम्हाला “How to Study Share Market in Marathi” विषयी माहिती मिळाली असेल तर तुम्हाला या आर्टिकल मध्ये काही तोटे आढळल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा