गुरुपौर्णिमा १०० ओळी मराठी निबंध

गुरुपौर्णिमा १०० ओळी मराठी निबंध: 2022 (guru purnima essay in marathi) #nibandhmarathi

गुरुपौर्णिमा १०० ओळी मराठी निबंध

गुरुपौर्णिमा मराठी निबंध 2022: आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूला खूप महत्त्वाचे स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला भगवानचा दर्जा देण्यात आला आहे तसेच संस्कृत मध्ये ‘गु’ चा अर्थ अंधकार म्हणजे अज्ञान असा आहे आणि ‘रु’ अर्थ प्रकाश म्हणजे ज्ञान असा आहे.

गुरूला अंधार रूपी अंधकार दूर करणारा प्रकाश मानले जाते. गुरुचे महत्व पटवून देण्यासाठी महान गुरू वेदव्यासजी यांची जयंती म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याच दिवशी भगवान शिव द्वारे आपल्या शिष्यांना ज्ञान दिले गेले होते असे आपल्या शास्त्रांमध्ये कथा आहेत. याच दिवशी अनेक महापुरुषांचा जन्म सुद्धा झालेला आहे. याच दिवशी भगवान गौतम बुद्धाने धर्म चक्र परिवर्तन केले होते आणि याच दिवसाला नेपाळ मध्ये गुरुपौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते तसेच या दिवशी नेपाळमध्ये ‘शिक्षक दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो. हे पर्व जून ते जुलै महिन्याच्या आत मध्ये येते. या उत्सवाला फक्त हिंदूच नाही तर जैन बौद्ध आणि शीख धर्मचे लोक सुद्धा मानतात. या दिवशी आपले आईवडील आपल्या मुलांना संस्कार देतात. या दिवशी गुरु सुद्धा आपल्या शिष्यांना संस्कार देतात.

आपली हिंदू संस्कृती आपल्याला गुरु आणि शिक्षक यांचा सन्मान करण्याचे शिकवतात तसेच गुरुपौर्णिमेला शिष्यांनी गुरुचे सन्मान करणे हे कर्तव्य असते. एका विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये गुरु हा खूपच महत्त्वाची भूमिका साकारत असतो. गुरूचे ज्ञान आणि संस्कारच्या आधारावर शिष्य आपले भविष्य बनवतो आणि ज्ञान प्राप्त करतो.

गुरु एका मूर्ख शिष्याला देखील योग्य व्यक्ती बनवतो संस्कृती आणि शिक्षण हे जीवनाचे मूळ स्वरूप आहे त्याच्या पासून वंचित असलेल्या व्यक्ती मूर्ख असतो गुरूच्या संस्काराने असा मूर्ख व्यक्ती ज्ञानी होतो.

गुरु आणि शिष्यच्या नात्यांमध्ये कोणता हि स्वार्थ नसतो सर्वांचे कल्याण हेच गुरुचे ध्येय असते. ज्या दिवशी गुरुचा शिष्य मोठ्या पदावर पोचतो त्यादिवशी गुरूला त्याच्या कार्याचा खूप अभिमान वाटतो.

गुरु पौर्णिमेचा दिवस कसा खास असतो?

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरूंच्या सन्मानार्थ अनेक उपक्रम राबवतात या दिवशी आपण आपल्या गुरू आणि शिक्षकांची पूजा करतो आणि त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतो. या दिवशी शाळा, महाविद्यालय, आश्रम, गुरुकुल मध्ये शिक्षक आणि गुरुंचा सन्मान करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. गुरूच्या स्मरणार्थ गीत, भाषण, कविता, नाटके सादर केली जातात.

महाभारत काळापासून गुरु द्रोणाचार्य हे एकलव्य, कौरव आणि पांडवांचे गुरू होते. परशुरामाजी हे कर्णाचे गुरु होते. भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु होते. गुरुचे किती महत्त्व आहे हे आपल्याला प्राचीन भारतापासून पाहायला मिळते.

गुरुपौर्णिमा १०० ओळी मराठी निबंध

1 thought on “गुरुपौर्णिमा १०० ओळी मराठी निबंध”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा