Guru Nanak Jayanti 2022: गुरुनानक जयंती मराठी भाषण

Guru Nanak Jayanti 2022: गुरुनानक जयंती मराठी भाषण

गुरुनानक जयंती 2022 मराठी भाषण Guru Nanak Jayanti 2022 Speech in Marathi (Bhashan) #gurunanakjayanti2022

Telegram Group Join Now

Guru Nanak Jayanti 2022: गुरुनानक जयंती मराठी भाषण

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “गुरुनानक जयंती 2022 मराठी भाषण” विषयी माहिती जाणून घेत आहोत. यावर्षी आपण गुरुनानक देवजी यांची 553 वी जयंती साजरी करत आहोत. गुरु पर्वावर अनेक संस्थांमध्ये, शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा आर्टिकल तुमच्या उपयोगी पडेल असा आम्हाला विश्वास आहे.

गुरुनानक जयंती मराठी भाषण 2022 ची सुरुवात कशी करावी.

आदरणीय,
प्राध्यापक, गुरुजी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो…

आज आपण गुरुनानक देवजी यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

गुरुनानक जयंती हा शीख समुदायांमध्ये सर्वात मोठा सण आहे. गुरुनानक जयंती हा शीख धर्मातील सर्वात प्राचीन सणापैकी एक आहे. गुरुनानक देव यांचा जन्मदिवस ‘गुरुनानक जयंती’ म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक जयंती कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला ‘कार्तिक पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. गुरुनानक शीख धर्माचे संस्थापक होते, ते पहिले शीख गुरु होते. गुरुनानक देवजी यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी राय-भाई-दि तलवंडी येथे झाला सध्या हे ठिकाण पाकिस्तानातील शेखपुरा जिल्ह्यात आहे ज्याला पाकिस्तान मध्ये आता नानकाना साहिब म्हणून ओळखले जाते.

गुरुनानक जयंतीला शीख लोक नवीन कपडे घालतात आणि गुरुद्वारांना भेट देतात. गुरुनानक जयंतीच्या सकाळची सुरुवात गुरुद्वारामध्ये प्रभात फेरी आणि भजन, गायनाच्या ठिकाणी मिरवणुकीने होते. शीख प्रार्थना करतात आणि गुरुनानक यांना श्रद्धांजली अर्पण करतात.

गुरुनानक देव हे शिखांचे पहिले गुरु आणि शिख धर्माचे संस्थापक होते. जगातून अज्ञान दूर करून अध्यात्मिक शक्ती आत्मसात करण्याची प्रेरणा देणारे ते एक महान पुरुष होते.

गुरुनानक जी यांची लहानपणापासूनच देवावर श्रद्धा होती. त्यांचे चित्त फक्त भक्तीतच होते, त्यांच्या दृष्टीने देव सर्व व्यापी आहे. ते मूर्ती पूजेचे कट्टर विरोधी होते. गुरु उत्सवाची सुरुवात भजन गायन्याने होते. या दिवशी गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन केले जाते.

आशा आहे की तुम्हाला गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त हे भाषण आवडले असेल जर तुम्हाला गुरुनानक देवजी यांच्या बद्दल डिटेल मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा: गुरुनानक देव जी मराठी कथा.

Guru Nanak Jayanti 2022: गुरुनानक जयंती मराठी भाषण

Leave a Comment