Ganesh Chaturthi Marathi Bhashan

Ganesh Chaturthi Marathi Bhashan (1st to 10th Students information about indian festival) #ganeshchaturthi2022

Ganesh Chaturthi Marathi Bhashan

नमस्कार मित्रांनो, दरवर्षी आपण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ‘गणेश चतुर्थी’ हा सण साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्र, भारत आणि आता जगभरामध्ये सुद्धा साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा दिवस हिंदूंचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपण भगवान गणेशची पूजा करतो कारण की भगवान गणेश हा बुद्धी आणि समृद्धीचा देवता आहे.

गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महत्त्वपूर्ण पर्व आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आहे. हा उत्सव भारतामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये खूपच उत्साहाने आणि भक्तीने भावाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा उत्सव येण्यापूर्वीच बाजारपेठांमध्ये आनंदाचे वातावरण दिसू लागते. हा सण हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. हा उत्सव दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. हा दिवस भगवान गणेश जन्मदिवस आहे जो माता पार्वती आणि भगवान शिव यांचा पुत्र आहे. भगवान गणेशजी हे बुद्धी आणि समृद्धीचे देवता आहेत म्हणून या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी भगवान गणेशाची पूजा केली जाते.

भारतामध्ये गणेश चतुर्थी हा खूपच मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जातो. हा उत्सव कार्यालय, शाळा-कॉलेज मध्ये साजरा केला जातो. या दिवशी सर्व कार्यालय आणि शिक्षण संस्था बंद असते. लोक या पर्वाची उत्सुकाता पूर्वक वाट पाहतात. हा उत्सव देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो पण, महाराष्ट्र मध्ये हा सण खूपच वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो कारण कि गणेश उत्सवाची सुरुवात महाराष्ट्र मधून झाली. महाराष्ट्रामधील लोकप्रिय नेते लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सवाची स्थापना केली होती म्हणूनच हा सण महाराष्ट्रमध्ये खूपच उत्सवात साजरा केला जातो.

गणेश चतुर्थी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. भक्त हा सण खूपच मोठ्या उत्सवात हा सण साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेश यांच्या जन्म दिवशी साजरी केली जाते. भगवान गणेशला ‘विघ्नहर्ता’ या नावाने देखील ओळखले जाते.

गणेश चतुर्थी हा अकरा दिवसाचा हिंदू उत्सव आहे. या दिवशी घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि अनंत चतुर्दशी या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. गणेश चतुर्थीला भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते तसेच मोदक, भक्ती गीते आणि मंत्रोच्चाराने प्रसन्न केले जाते. भगवान गणेशजी हे बुद्धिमत्ता आणि समृद्धीचे देवता आहे त्यामुळे भगवान गणेश कडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवान गणेशाची पूजा केली जाते.

गणेश चतुर्थी भाषणाची सुरुवात कशी करावी?

गणेश चतुर्थी भाषणाची सुरुवात ‘नमस्कार मित्रांनो’ किंवा ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ या वाक्याने करावी.

गणेश चतुर्थी कधी साजरी केली जाते?

गणेश चतुर्थी ‘ऑगस्ट किंवा सप्टेंबर’ महिन्यामध्ये साजरी केली जाते

Ganesh Chaturthi Marathi Bhashan

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon