Gandhi Jayanti Speech in Marathi (Bhashan)

Gandhi Jayanti Speech in Marathi: गांधी जयंती मराठी भाषण (Gandhi Janyanti Marathi Bhashan 2022) #marathispeech

Gandhi Jayanti Speech in Marathi (Bhashan)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Gandhi Jayanti Speech in Marathi (गांधी जयंती मराठी भाषण) विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Gandhi Jayanti Speech in Marathi 10 Lines:

मित्रांनो, दरवर्षी देशांमध्ये 2 ऑक्टोंबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गांधीजी हे थोर राजकारणी आणि समाज सुधारक होते. स्वातंत्र्यचळवळीत सत्य आणि अहिंसेच्या मार्ग अवलंबून त्यांनी ब्रिटिश सरकारला अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडले. सत्य आणि अहिंसा ही त्यांची तत्त्वे होती. शास्त्र शिवाय आपले हक्क कसे मिळवता येतील याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले. 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त देशाचा विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वाद-विवाद भाषण आणि निबंध लेखन या स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. आज आपण गांधी जयंती भाषणाने समाजाला जागृत करणार आहोत.

How to start a Gandhi Jayanti 2022 Speech in Marathi

गांधी जयंती 2022 भाषणाची सुरुवात कशी करावी

आदरणीय
मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो…

आज गांधी जयंती निमित्त आपण येथे जमलो आहोत. महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करून आपला देश त्यांना आदरांजली वाहतो. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. महात्मा गांधींनी सत्य आणि मार्ग अवलंबून इंग्रजांना अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडले.

गांधीजींच्या महानतेचा अंदाजावरून लावता येतो की आज भारताबाहेर जगातील इतर अनेक देशांमध्ये त्यांचे पुतळे आहेत. ठिकाणी त्यांची नावे आहेत त्यांच्या विचारांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 ऑक्टोंबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.

आज बाबूजींच्या जीवनाचा ठसा आपल्या खानपानावर, जीवनशैलीवर, भावभावनावर, भाषाशैली व स्पष्टपणे दिसून येतो. गांधीजी हे सहिष्णुता आणि साधेपणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्याकडे अप्रतिम नेतृत्व क्षमता होती स्वातंत्र्यचळवळीत लोकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली तुरुंग भरले, त्यांची सविनय कायदेभंगाची चळवळ, असहकार चळवळ, परकीय कपड्यांवर बहिष्कार, चंपारण्य सत्याग्रह, दांडी सत्याग्रह, मिठाचा कायदा, भारत छोडो यासारख्या चळवळींनी इंग्रजांच्या नाकीनऊ आले आणि स्वातंत्र्याच्या मार्ग सोयीस्कर झाला.

गांधीजीनी भारतीयांना स्वदेशी वस्तू वर प्रेम करायला शिकवले. विदेशी कपड्यांची होळी केले त्यामुळे देशी उद्योगांना चालना मिळाली आहे. स्वातंत्र्य शिवाय गांधीजींचे आणखी एक स्वप्न होते ते म्हणजे ‘ग्रामस्वराज्य’ गावे स्वयंपूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. गावात उद्योगधंदे बळकट झाले पाहिजे. 1993 मध्ये देशात ‘पंचायत राज’ व्यवस्था लागू झाल्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.

मित्रांनो, या दिवशी आपण गांधीजींचे विचार आपल्या जीवनात अमलात आणण्याची शपथ घेतली पाहिजे.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

धन्यवाद
जय हिंद

गांधी जयंती 2022 भाषणाची सुरुवात कशी करावी?

गांधी जयंती 2022 भाषणाची सुरुवात ‘आदरणीय प्राध्यापक, शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो’ या वाक्याने करावी.

गांधी जयंती केव्हा साजरी केली जाते?

दरवर्षी 2 ऑक्टोंबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो.

Gandhi Jayanti Speech in Marathi (Bhashan)

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा