‘ड्रीम गर्ल २’ या दिवशी होणार रिलीज

लवकरच अभिनेता आयुष्मान खुराना चा ‘ड्रीम गर्ल २‘ हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. नुसतच ‘ड्रीम गर्ल टू’ चा ट्रेलर करण्यात आलेला आहे आणि हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

वर्ष 2019 मध्ये ड्रीम गर्ल हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता या चित्राचे संपूर्ण कथा पूजा या पात्रावर आधारित होते. या चित्रपटांमध्ये ‘आयुष्मान खुराना‘ यांनी स्त्री व्यक्तिरेखा साकारली होती आणि हा चित्रपट तेव्हा सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा स्विकवल ‘ड्रीम गर्ल २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कसा असेल ड्रीम गर्ल टू चित्रपट?

या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना कर्जबाजारी झाल्यामुळे पुन्हा एकदा पूजाचा स्त्री वेश परिधान करून गाणी गाण्यास फोनवर बोलण्यास सुरुवात करतो असे दाखवण्यात आले आहे.

चित्रपटांमध्ये अभिनेत्रीच्या मुख्य भूमिकेत ‘अनन्या पांडे‘ असणार आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आयुष्यमान ने ‘ट्रॅफिक जाम होणार कारण चार वर्षांनी ड्रीम गर्ल पूजा परत येणार’ असे कॅप्शन दिलेले आहे.

ड्रीम गर्ल २ मूवी कास्ट

चित्रपटांमध्ये आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे, परेश रावल, असरानी, राजपाल यादव, मनजोत सिंग आणि अनु कपूर यांच्यासारख्या अनुभवी कलाकार असणार आहेत.

हा चित्रपट 25 जुलै रोजी रिलीज होणार होता पण त्याची तारीख बदलून आता 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

1 thought on “‘ड्रीम गर्ल २’ या दिवशी होणार रिलीज”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group