Dhulivandan Information in Marathi

Dhulivandan Information in Marathi (Holi Festival, Color Festival, Happy Festival)

Dhulivandan Information in Marathi

धुलीवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळला जाणारा रंगांचा सण आहे. या दिवशी लोक आपसात मधील मतभेद विसरून एकमेकांना रंग लावतात. हा सण आनंदाचा सण आहे, या दिवशी लोक आपले दुःख विसरून एकमेकांसोबत आनंदाने हा दिवस साजरा करतात.

धुलीवंदन या सणाला होळी म्हणून देखील ओळखले जाते. उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशीच धुलीवंदन खेळले जाते. पण महाराष्ट्रामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन खेळले जाते.

यावर्षी आपण 7 मार्च रोजी धुलीवंदन हा सण साजरा करणार आहोत.

धुलीवंदन हा सण फाल्गुन महिन्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे होलीका दहनाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने शेतकरी आणि शेतातील प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे. आपल्या रात्री जाळलेल्या होलिकेच्या राखीची आणि मातीची पूजा शेतकरी चांगल्या पिकासाठी करतात.

धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. अंगाला फासतात व नंतर स्नान करतात.

काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे.

Dhulivandan Information in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा