बंगालच्या उपसागरातील मोका वादळानंतर आता उत्तर हिंदू महासागरामध्ये दुसरे चक्रीवादळ येत आहे.
यावेळी भारतीय मुख्य भूमीच्या पश्चिमेकडे गेल्या काही दिवसापासून एक वादळ तयार होत आहे. ही प्रणाली ६ जून रोजी चक्रीवादळामध्ये तकदीर झाली आहे.
या चक्रीवादळाला बिपरजॉय असे नाव देण्यात आलेले आहे. “हे नाव बांगलादेशाने दिलेले नाव आहे ‘बिपरजॉय’ शब्दाचा अर्थ ‘आपत्ती, नुकसानदायक’ असा होतो.”
या आठवड्याच्या शेवटी हे चक्रीवादळ उग्ररूप धारण करेल असा तज्ञांचा मत आहे. या चक्रीवादळाचे नामांकन जागतिक हवामान संघटनेने (WMO) केलेले आहे.