बाल दिना विषयी माहिती – Children’s Day Information In Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण बाल दिना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो यालाच आपण इंग्लिश मध्ये ‘Happy Children’s Day’ म्हणून ओळखतो. चला तर जाणून घेऊया बालदिन म्हणजेच ‘चिल्ड्रन्स डे’ बद्दल थोडीशी रंजक माहिती.
बाल दिना विषयी माहिती – Children’s Day Information In Marathi
Children’s Day Information In Marathi: भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले आणि गुलाबांची फुले फार आवडत असे, त्यांच्याकडे प्रौढ व्यक्तींसाठी वेळ नव्हता; परंतु त्यांच्याकडे नेहमीच लहान मुलांसाठी वेळ होता. त्यांचे असे म्हणणे होते, की मुलांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालन पोषण केले पाहिजे. कारण की ते देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक होणार आहेत ते देशाचे सामर्थ्य आणि समाजाचा पाया आहेत.
बाल दिवस हा बालदिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. यामध्ये मुलांचे हक्क काळजी आणि शिक्षण याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दर वर्षी भारतामध्ये 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. आजची मुले हे देशाचे भविष्य आहेत. यश आणि विकासाची गुरुकिल्ली आहे आणि जे देशाला नवीन तंत्रज्ञानाच्या मार्गाने नेत आहे.
पंडित नेहरूंनी भारतातील मुलांचे तसेच तरुणांचे शिक्षण, प्रगती, कल्याण आणि विकासासाठी खूप काम केले होते. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. भारतातील मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी शाळेतील मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण आणि दुधासह मोफत जेवण देण्यात आले होते.
बालदिन कधी साजरा केला जातो? – When is Children’s Day
बालदिन दर वर्षी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जयंती दिवशी हा दिवस साजरा केला जातो जो 14 नोव्हेंबर रोजी येतो. (पंडित नेहरू यांची संपूर्ण माहिती)
बालदिन 14 नोव्हेंबर 2021 (Children’s Day 2021)
यावर्षी म्हणजेच 14 नोव्हेंबर 2019 रोजी बालदिन रविवारी येत आहे शाळेला सुट्टी असल्यामुळे हा दिवस पंधरा तारखेला म्हणजे सोमवारी साजरा करण्याचा निर्णय शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतलेला आहे. बालदिन म्हणजेच (Children’s Day) या दिवशी शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्यामध्ये भाषण आणि निबंध लेखन सारख्या परीक्षा देखील घेतल्या जातात. (बालदिन निबंध मराठी १०० ओळी)
आपण बालदिन का साजरा करतो?
पंडित नेहरूंना आदरांजली म्हणून बालदिन साजरा केला जातो. ज्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता. त्यांना लहानपणापासूनच छोटी मुले फार आवडत असे त्यांनी 1955 मध्ये लहान मुलांसाठी स्वदेशी सिनेमा तयार करण्यासाठी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडिया ची स्थापना केली होती.
बाल दिनाची सुरुवात कोणी केली?
बालदिनाची पायाभरणी 1925 मध्ये झाली होती आणि 1953 मध्ये त्याला जगभरामध्ये मान्यता मिळाली. 20 नोव्हेंबर रोजी, संयुक्त राष्ट्रांनी (UN) बालदिन साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतात 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात आला. पण अनेक देशांमध्ये तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. 1950 प्रमाणे, बालदिन (1 जून) अनेक देशांमध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो जो जागतिक बाल दिन म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1959 मध्ये भारतात पहिला बालदिन साजरा करण्यात आला. परंतु 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर बालदिन साजरा करण्याची तारीख बदलून 20 नोव्हेंबर ऐवजी 14 नोव्हेंबर करण्यात आली. हा दिवस नेहरू यांचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस नेहरू यांना आदरांजली देण्यासाठी साजरा केला जातो.
1964 पूर्वी भारतात 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करत असे, हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा करत असे, तथापि 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सक्षम प्रशासक अन यासोबतच नेहरूंनी भारतातील काही प्रमुख शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे एम्स, आयआयटी आणि आयआयएम (MIS, IIT & IIM)ची स्थापना झाली होती.
ते एकदा म्हणाले होते, “ आजची मुले उद्याच्या भारत घडवतील, आपण त्यांना ज्या पद्धतीने वाढवतो ते देशाचे भविष्य ठरवेल.”
नेहरूजींना चाचाजी कोणी म्हटले?
नेहरूंची ‘चाचाजी’ यामागे कोणतेही कागदोपत्री कारण नाही. तथापि या शब्दाच्या नान्यामागच्या त्यांचे मुलांवर प्रेम हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. दुसरी लोकप्रिय आवृत्ती अशी आहे की नेहरू हे महात्मा गांधीजींच्या अगदी जवळचे होते, ज्यांना ते आपला मोठा भाऊ मानत होते. गांधी यांना ‘बापू’ म्हणून ओळखले जात होते तर नेहरूजींनी ‘चाचाजी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
बाल दिनाची हि राष्ट्रीय सुट्टी आहे का?
नाही, बाल दिन ही राजपत्रित सुट्टी नाही या उलट शाळा हा दिवस साजरा करण्यासाठी शाळेमध्ये स्पर्धा, संगीत आणि नृत्य सादरीकरण यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करतात. हा दिवस मुलांना त्यांच्यामधील सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी आयोजित केला जातो.
बालदिन विशेष मुलांचे हक्क काय आहेत?
भारतातील राज्य घटनेनुसार मुलांच्या हक्कांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो जे तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकतात.
- सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार.
- कोणत्याही धोकादायक रोजगारापासून संरक्षित करण्याचा अधिकार.
- बालपण काळजी आणि शिक्षणाचा अधिकार.
- गौरवयापासून संरक्षित होण्याचा अधिकार.
- लहान मुलांच्या वय किंवा सामर्थ्यला अनुकूल नसलेल्या व्यवसायामध्ये प्रवेश करण्यापासून संरक्षित करण्याचा अधिकार.
- निरोगी पद्धतीने विकसित होण्यासाठी समान संधी आणि सुविधा मिळण्याचा अधिकार.
- स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचा हक्क आणि शोषणाविरुद्ध बालपण आणि तरुणपण आचे संरक्षण.
बालदिन हा जगभरामध्ये साजरा केला जातो का?
हो नक्कीच बाल दिनाची सुरुवात 1857 मध्ये Reverend Dr Charles Leonard यांनी Chelses, US येथे केली. जरी सर्व जगामध्ये 1जून रोजी जगामध्ये बहुतेक देशांमध्ये बालदिन जागतिक स्तरावर साजरा केला जात असला तरी जागतिक बालदिन हा दर वर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. पण भारतामध्ये. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली देण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो.
भारतामध्ये बालदिन कसा साजरा केला जातो? – Children’s Day India
Children’s Day School: संपूर्ण भारतात सांस्कृतिक आणि मजेदार उपक्रमासह अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सरकारी आणि गैर-सरकारी संस्था, शाळा, एनजीओ, खाजगी संस्था आणि इतर मुलांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांना आनंदी करण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. टिव्ही चैनल वर 14 नोव्हेंबर रोजी मुलांसाठी मनोरंजक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक देखील दाखवले जातात. आपल्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी पालक या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी होतात ते त्यांच्या मुला-मुलींना भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड तसेच पिकनिकला किंवा लॉंग ड्राईव्ह ला घेऊन जातात. अशाप्रकारे भारतामध्ये बाल दिन साजरा केला जातो.
बाल दिनाचे नियोजन कसे करावे?
देशाचे भविष्य मुलांवर अवलंबून आहे. त्यांचा योग्य पद्धतीने विकास झाला नाही तर देशाचे भविष्य उध्वस्त होईल. जे लोक आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतात त्यांना या दिवशी विचार करण्याची संधी मिळेल. संपूर्ण समाजाने मुलांच्या प्रती आपले कर्तव्य आणि जबाबदारी याचा विचार केला पाहिजे.मुलांसाठी यापूर्वी काय केले गेले आणि आगामी काळात काय करता येईल याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
बाल दिनाचे नियोजन कसे करता येईल: अनेक गैर-सरकारी संस्था गरीब आणि वंचित मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करतात. मुलांना भेटवस्तू आणि चॉकलेटचे वाटप केले जाते. फॅन्सी ड्रेस, वाद-विवाद, स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित भाषण, देश, कथाकथन, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धाचे आयोजन करावे. तसेच गाणे, नृत्य आणि इतर वाद्यांसह मनोरंजन सारखे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम यासारखे नियोजन करावे. कपडे, खेळणी, वाद्य, स्टेशनरी, पुस्तके इत्यादी वाटून तुम्ही मुलांचे मनोरंजन करू शकता अशाप्रकारे बालदिनाचे नियोजन केले जाऊ शकते.
Final Word:-
बाल दिना विषयी माहिती – Children’s Day Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “बाल दिना विषयी माहिती – Children’s Day Information In Marathi”