चंद्रयान 3 मराठी भाषण (प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे भाषण)

चंद्रयान 3 मराठी भाषण (प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे भाषण) [Chandrayaan 3 Marathi Bhashan, Chandrayaan 3 Speech in Marathi]

चंद्रयान 3 मराठी भाषणाची सुरुवात कशी करावी?

आदरणीय
महोदय, शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…

Chandrayaan 3 Nibandh Marathi

23 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 6:30 वाजता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी असे काही काम केलेले आहे ज्याचा अभिमान आपल्या भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला झालेला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आज फळ मिळालेले आहे. चंद्रयान 3 हे सक्सेसफुल चंद्रावर उतरलेले आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रयान 2 अपयशी झाल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन चंद्रयान 3 मोहीम यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. आणि या मेहनतीचे परिणाम स्वरूप भारत हा जगातील पहिला देश बनलेला आहे ज्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचला आहे.

आज मला भारतीय होण्याचा खूप अभिमान वाटत आहे. एकेकाळी गरीब म्हटल्या जाणाऱ्या देशाला, ज्याच्याकडे स्वतःचे रॉकेट बनवण्याची पात्रता नाही, जे स्वतःचे रॉकेट बैलगाडीवरून नेतात अशी टीका करणारे लोक आज भारताचे गुणगान गात आहेत.

मला भारतीय असण्याचा आणखी एक अभिमान असा आहे की रॉकेट म्हणजेच अग्निबाणाची रचना भारतातून झालेली आहे.

आज आपला भारत देश एका वेळेस 104 उपग्रह अवकाशामध्ये सोडतो. दुसरीकडे नासा आणि स्पेस एक्स सारखे मोठ्या कंपनी भरमसाठ पैसे घेऊन आपले सॅटॅलाइट अवकाशामध्ये सोडतात. पण आपला भारत देश खूपच कमी किमतीमध्ये स्वतःचे आणि दुसऱ्या देशाचे देखील उपग्रह अवकाशामध्ये सोडतो.

इंग्रजांनी लूट केल्यानंतर आपल्या देशामध्ये सगळीकडेच गरिबीचे वातावरण पाहायला मिळाले. 1991 मध्ये आपल्याकडे तेरा दिवस पुरेल एवढाच पैसा उरला होता पण त्यावरही आपण मात करून भारताला पुढे नेण्याचे काम केले.

आपल्या भारतामध्ये कितीही अडचणी असल्या तरी, मतभेद असले तरी आपण एक भारतीय आहोत हे भारतातील लोक कधीही विसरत नाही.

भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपल्या प्रतिज्ञात लिहिलेले आहे.

पूर्वी आपला भारत देश विश्व गुरु म्हटला जात होता आणि आज देखील आपला भारत देश विश्वगुरू होण्याच्या वाटचालीवर आहे.

23 ऑगस्ट 2023 ही तारीख जगाच्या इतिहासामध्ये सोनेरी शब्दांनी लिहिली जाईल कारण की आज आपल्या भारत देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.

1 thought on “चंद्रयान 3 मराठी भाषण (प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे भाषण)”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon