सीसीटीव्ही म्हणजे काय? – CCTV Full Form In Marathi

CCTV Full Form In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘CCTV’ विषयी माहिती जाणून घेणार आहोत. नेहमी आपण सोसायटीमध्ये न्यूज मध्ये किवा प्राइवेट ठिकाणी जसे की मॉल सिनेमागृह या ठिकाणी वाचतो की आपण सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहोत पण नक्की आपण सीसीटीव्ही म्हणजे काय याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? आपल्यापैकी बहुतेक जण आला सीसीटीव्ही चा फुल फॉर्म माहिती असेल पण हा अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांना सीसीटीव्ही विषयी काहीही माहिती नाही चला तर जाणून घेऊया सीसीटीव्ही म्हणजे काय या विषयी थोडीशी माहिती.

सीसीटीव्ही म्हणजे काय? – CCTV Full Form In Marathi

CCTV Full Form In Marathi: सीसीटीव्ही चे पूर्ण स्वरूप मराठीमध्ये क्लोज सर्किट टेलिव्हिजन आहे. संक्षिप्त शब्दांमध्ये आपण सीसीटीव्ही असे म्हणतो. हा शब्द थोडासा कठीण असला तरी दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी आहे.

  • सीसीटीव्ही मराठी अर्थ: क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन
  • CCTV Full Form In Marathi: Closed Circuit Television

हा एक कॅमेरा असतो जो निगराणी किंवा रक्षणासाठी वापरला जातो. सीसीटीव्ही प्रामुख्याने घराच्या प्रवेशद्वार किंवा कार्यालय रुग्णालय इत्यादी ठिकाणी लावला जातो सध्या आधुनिक जगामध्ये सीसीटीव्ही कोणताही व्यक्ती आपल्या रक्षणासाठी आपल्या घरामध्ये दुकानांमध्ये लावू शकतो.

CCTV Information In Marathi

सीसीटीव्ही कॅमेरा समोर होणारी प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करतो आणि मुख्य रिसिवर संगणकावर पाठवतो मुख्य संगणक त्याचे सर्व रेकॉर्डिंग त्याच्या हार्ड ड्राइव्ह मध्ये सेव करतो. जेव्हा जेव्हा हे रेकॉर्डिंग आवश्यक असते तेव्हा तेव्हा ते वापरले जाते. सीसीटीव्ही लाईव चालत असलेले तरी तुम्हाला ते लाईव्ह पाहता येऊ शकतात. सीसीटीवी मुळे गुन्हेगारी कसे प्रमाण खूपच कमी झालेले आहे कारण की सीसीटीवी मुळे ताबडतोब गुन्हेगारांचा शोध लावला जातो त्यामुळे सीसीटीव्ही आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाचे तंत्र आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा सिग्नल किंवा रेकॉर्डिंग प्रसारित करण्यासाठी किंवा प्रसारित करण्यासाठी किंवा वायरलेस ट्रान्समीटर चा वापर करतो.

सीसीटीव्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते व्हिडिओ ऑडिओ दोन्ही प्रसारित करू शकतो. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कमी प्रकाशातील छायाचित्रे रेकॉर्ड करण्याची नाईट विजन क्षमता देखील असते.

सीसीटीव्ही कॅमेरा सिग्नल सार्वजनिक रित्या वितरित केला जात नाही परंतु सुरक्षेसाठी वापरला जातो.

सीसीटीव्ही चे फायदे

सीसीटीव्ही चे अनेक फायदे आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा हा आज चोरांसाठी मोठा अडथळा ठरलेला आहे कारण अनेकदा चोराला आपण सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याचे समजले की तो तिथून निघण्याचा विचार करतो. सीसीटीव्ही कॅमेरा मुळे गुन्हेगारी कमी होत आहे आणि त्यामुळेच रिमोट द्वारे लक्ष ठेवणे सुलभ झाले आहे.

घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही हा उत्तम पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे फुटेज पोलिसांना गुन्हेगारांच्या तपासात मोलाची मदत करते.

सीसीटीव्हीचा इतिहास – History of CCTVCCTV In Marathi

1942 मध्ये वॉल्टर ब्रूच यांनी सीसीटीव्ही चा शोध लावला मित्रांनो आता तुम्हाला माहिती असेलच की सीसीटीव्ही चा वापर कशासाठी केला जातो आणि हे काम सुरक्षतेसाठी केले जाते सीसीटीव्ही क्लोज सर्किट टेलिव्हिजन म्हणतात कारण सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सार्वजनिक रित्या वितरित केला जात नाही सीसीटीव्ही चा वापर फक्त आणि फक्त सुरक्षा उद्देशासाठी केला जातो.

एका सीसीटीव्ही कॅमेरा ची किंमत किती असते?

मार्केटमध्ये ब्रँड नुसार सीसी टीव्हीचे कॅमेरे येतात तसे पाहायला गेले तर सीसीटीव्ही कॅमेरे ची किंमत पाचशे रुपयांपासून दहा हजार रुपयापर्यंत आहे सर्वात जास्त हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किंमत 50 हजार रुपये पर्यंत असू शकते.

सीसीटीव्ही कॅमेरा ची किंमत पुणे शहरामध्ये किती आहे?

CCTV Camera Price Near Pune: पुण्यातील टिळक रोड या परिसरामध्ये किंवा आप्पा बळवंत चौकांमध्ये तुम्हाला ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॅमेरा ची दुकाने मिळतील येथे तुम्ही योग्य किमतीमध्ये कॅमेरा घेऊ शकतो.

CCTV Camera Price Near Pimpri-Chinchwad, Maharashtra?

सीसीटीव्ही कॅमेरा प्राईज पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी याठिकाणी शगुन चौकामध्ये तुम्हाला सीसीटीव्ही असलेले मोठे ब्रँडचे कॅमेरे योग्य किमती मध्ये मिळतील.

CCTV Camera Price Amazon?

ऍमेझॉन सारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट वर तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा मिळू शकतो या कॅमेऱ्याची किंमत 1000 पासून 50000 रुपयांपर्यंत असू शकते.

कोणता सीसीटीव्ही कॅमेरा घरासाठी योग्य आहे?

तसे पाहायला गेले तर घराच्या सुरक्षिततेसाठी योग्य आणि हाय कॉलिटी असलेले कॅमेरे वापरायला हवे त्यासाठी आम्ही तुम्हाला काही कॅमेरे सुचवत आहे. जरी या कॅमेऱ्याची किंमत जास्त असली तरी हे घरासाठी योग्य कॅमेरे आहे. Mi 360° 1080p Full HD WiFi Smart Security Camera, TP-Link Tapo C200 Smart Cam Pan Tilt Home Wi-Fi Camera.

Final Word:-
सीसीटीव्ही म्हणजे काय? – CCTV Full Form In Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

सीसीटीव्ही म्हणजे काय? – CCTV Full Form In Marathi

2 thoughts on “सीसीटीव्ही म्हणजे काय? – CCTV Full Form In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा