आपल्या लहान भावाला नियमित अभ्यास करण्याचे महत्व पटवून देणारे पत्र
आपल्या लहान भावाला नियमित अभ्यास करण्याचे महत्व पटवून देणारे पत्र | Brother Letter in Marathi
।।श्री।।
आदर्श विद्यालय वस्तीगृह,
आदर्श विद्यालय पुणे 41107
दिनांक: 21 डिसेंबर 2021
चिरंजीवी अनूप यास,
अनेक आशीर्वाद.
कालच आईचे पत्र मिळाले. आईची तक्रार वाचून वाईट वाटले. आई ने पत्रात लिहिले आहे की तू नीट अभ्यास करत नाहीस त्यामुळे तू अभ्यासात मागे पडत आहेस. पहिल्या सत्र परीक्षेची टक्केवारी बरीच कमी झाली, अनुप ही बाब अत्यंत खेदाची आहे. खरे पाहता यापूर्वीही तू वर्गात नेहमी पहिला किंवा दुसरा असायचा पण यंदाच्या सुरुवातीपासून तो अभ्यासाकडे दुर्लक्ष केले आहे.
असे वाटते पहिल्या चाचणी तही तुला कमी गुण मिळाले होते तेव्हाच मी तुला अधिक अभ्यास करायला सांगितले होते पण त्यावेळी तू हसून म्हणाला होतास “या चाचणीला महत्त्व नाही मी यापुढे खूप अभ्यास करीन” पण या सुट्टीत तू अभ्यासाशिवाय खेळाकडे जास्त लक्ष दिले.
अनुप सुट्टी ही मौज करण्यासाठी व आनंद लुटण्यासाठी असते हे मला मान्य आहे; पण दिवसातून एखादा तास अभ्यास करायला हरकत नाही त्यामुळे अभ्यासाची सवय जात नाही.
अनुप अजूनही तुला आपल्या अभ्यासाच्या पद्धती सुधारणा घडवण्याची संधी आहे. पुढच्या वर्षी तुला पुण्याला शाळेला जायचे आहे ना? मग हे चार महिने नियमित अभ्यास कर नियमित अभ्यास केल्याने अभ्यासाचे ओझे वाटत नाही. अभ्यासाठी वेळापत्रक आख उत्तम गुण मिळवायचेच अशा निर्धाराने अभ्यासाला लाग स्वतः वाचून त्याची टिपणी काढायला लाग. मग नक्कीच तुला अपेक्षित यश मिळेल.
मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्यास सुरुवात केल्याचे मला पत्राने कळव. मी वाट पाहात आहे.
तुझा,
दादा
बारावीची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत मामाकडे जाणारे पत्र