Makar Sankranti 2023 Wishes in Marathi: Best Top 10 Makar Sankranti Wishes in Marathi

Makar Sankranti 2023 Wishes in Marathi: Best Top 10 Makar Sankranti Wishes in Marathi [मकरसंक्रांत २०२३ मराठीत शुभेच्छा, मराठीतील सर्वोत्तम १० मकर संक्रांतीच्या शुभेच्छा] #happysankranti2023

Makar Sankranti 2023 Wishes in Marathi

मकर संक्रांती हा एक हिंदू सण आहे जो भारत आणि नेपाळच्या अनेक भागात साजरा केला जातो. हे सूर्याचे त्याच्या खगोलीय मार्गावरील मकर (मकर) राशीत संक्रमण दर्शवते. ही घटना हिवाळ्यातील संक्रांतीसह महिन्याच्या शेवटी आणि दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते. हे सहसा 14 किंवा 15 जानेवारीला येते. हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात संक्रांती अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये उत्सव, प्रथा आणि विधी भिन्न असू शकतात. हा एक कापणीचा सण आहे आणि मिठाईची देवाणघेवाण करून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला जातो.

Best Top 10 Makar Sankranti Wishes in Marathi

तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू…
मधुर नात्यांसाठी गोड गोड बोलू…!
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा…!

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी हीच शुभेच्छा, संक्रात वर्ष दिनी…!

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा…!

फक्त सणाला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण सनापुर ते गोड न राहता आयुष्यभर गोड राहू या..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे,
फुलाचे गीत ऐकावे असे कान नाहीत माझे,
चंद्र सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे हृदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड बोला.

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा…
तिळगुळ घ्या गोड बोला.

विसरून जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्यक्ष आणि गगनी भिडावा…
शुभ संक्रात

नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे,
तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे.
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा…!

गोड गोड शब्दांचा फुलावा पाक,
स्नेहाचे तिळ मिळावा त्यात,
तिळावर फुललेला पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2023 Wishes in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा