अनिल अगरवाल: Success Story in Marathi

अनिल अगरवाल: Success Story in Marathi (Anil Agarwal Vedanta)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘अनिल अगरवाल‘ यांच्या सक्सेस स्टोरी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज बिजनेस क्षेत्रामध्ये जे काही मोठे नाव दिसत आहे त्याच्यामागे एखाद्याचा संघर्ष बॉलीवूडच्या मसालेदार चित्रपटापेक्षा कमी नाही.

वेदांत रिसोर्सेस (Vedanta Resources) हे नाव आज जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि याची स्थापना केली अनिल अग्रवाल यांनी केली.

  • अनिल अगरवाल यांनी वेदांत कंपनी सुरू करणे आधी 9 व्यवसाय केले होते पण त्यांना नेहमीच अपयश आले.
  • पण निराशाने ते कधीच खचले नाही त्यांनी नेहमी प्रयत्न करत राहिले.
  • आणि वेदांत रिसोर्सेस ही एक मोठी कंपनी त्यांनी स्थापन केली जी देशातील एक यशस्वी कंपनी ठरली.

अनिल अग्रवाल यांना केंब्रिज विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. एका छोट्याशा व्यावसायिक कुटुंब जन्मलेले अनिल अग्रवाल मूळचे बिहारची राजधानी पटना येथील आहे. वयाच्या 19 व्या वर्षी घरचा व्यवसायिक बिजनेस सोडून ते मुंबईला आले. आजपर्यंत अनिल अग्रवाल यांनी 9 व्यवसाय सुरू केले पण त्यांना नेहमीच अपयश मिळत राहिले. पण ते निराशाने खचले नाही तर आपल्या जिद्दी व मेहनतीच्या बाळावर त्यांनी वेदांत रिसोर्सेस नावाची कंपनी सुरू केली.

छोट्याशा मारवाडी कुटुंबात जन्मलेले अनिल अग्रवाल यांचे लहानपणापासूनच मोठे व्यवसाय करण्याचे स्वप्न होते. वयाच्या 19 व्या वर्षी येथे वडिलांचा व्यवसाय सोडून मुंबईत आले आणि स्वतःसाठी मार्ग शोधू लागले. काही दिवसापूर्वी अनिल अगरवाल यांनी सोशल मीडियावर छोटीशी स्टोरी शेअर केली होती ज्यामध्ये त्यांनी बिहार सोडून मुंबईला आल्याची आठवणीची पोस्ट शेअर केली होती.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की “फक्त एक जेवणाचा डबा आणि डोळ्यात स्वप्न घेऊन मी मुंबईला आलो.”

अनिल अगरवाल मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते.

अनिल अग्रवाल यांनी मुंबईला आल्यानंतर 1970 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी रद्दीचा व्यवसाय सुरू केला.

केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधीताना ते म्हटले की मी माझ्या वयाची 20-30 वर्ष संघर्ष करण्यात घालवली. मी यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिलो. मी 9 वेळा अपयशी झालो. मी नेहमीच निराशामध्ये होतो.

भंगार व्यवसायातून छोटा व्यवसाय सुरू करत त्यांनी ठाणे आणि धातूचे सर्वात मोठे व्यापारी बनले.

केंब्रिज मधील विद्यार्थ्यांना संबोधताना त्यांनी असे म्हटले की मी कधीही कॉलेजला गेलो नाही पण इथल्या मुलांना संबोधित करणे हे त्यांच्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.

आज अनिल अग्रवाल हजारो कोटीचे मालक आहेत.

अनिल अगरवाल: Success Story in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon