अंधश्रद्धा एक शाप निबंध १०० ओळी  | Andhshradha Ek Shap Nibandh Marathi 100 Line

प्रस्तावना
अंधश्रद्धा एक शाप निबंध: अंधश्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास आंधळ्या पायावर उभी! आजच्या मानवाने समुद्रतळाच्या शोध व आकाशाला गवसणी घातले आहे. साडेसाती यात मानव अडकून पडला या प्रथेचे आपल्या देशात प्राबल्य फार आहे. याला स्वार्थी माणसे खत पाणी घालतात मांजर आडवे जाणे, टिटवी ओरडणे घुबडाचा घुत्कार हे अशुभ मानले जाते. नरबळी देणे या सारख्या घटना आजही भारतासारख्या विकसनशील देशामध्ये घडत आहेत, याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे ते म्हणजे भारतामध्ये असलेले निरक्षरता या सर्व गोष्टी अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. भारताकडे एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा भारताचा हवा तसा विकास झालेला नाही याला कारण म्हणजे भारतामध्ये असलेली अज्ञानता आणि अंधश्रद्धावर असलेला मोठा पगडा या सर्वच गोष्टी भारताला मागे घेऊन जाण्याचे काम करतात. सध्या 21 व्या शतकामध्ये सुद्धा अशा गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडताना दिसतात.

अंधश्रद्धा एक शाप निबंध १०० ओळी  | Andhshradha Ek Shap Nibandh Marathi 100 Line

अंधश्रद्धा हा मानव समाजाला मिळालेला एक शाप आहे. अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो. श्रद्धा मानवाची जीवनातील एक अमूल्य ठेव आहे. आई-वडील, गुरुजन यांच्याविषयी श्रद्धा ही खचितच अभिमानास्पद बाब आहे. पण कोणत्याही श्रद्धेचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिणत होऊन समाजाला हानिकारक ठरतो. बुवा, साधू, महांत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या अनेक वार्ता सतत आपल्या कानावर येतात तेव्हा लक्षात येते की, अजूनही आपल्या तथाकथित प्रगत समाज अंधश्रद्धेच्या निबाड अंधारातच चाचपडत आहे.  या विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धाळू मंडळी बुवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतात कसा आहे काही कळत नाही.

अजूनही अंधश्रद्धेचा पगडा आमच्या समाजातून पूर्णपणे गेलेला नाही. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मालवण जवळच्साया जंगलात सात जणांचा निर्घुण सहार करण्यात आला केवढी ही घृणास्पद गोष्ट. पैशांचा पाऊस पडणे शक्य असते तर तसे करू शकणारा बुवा स्वतः पाऊस पाडून श्रीमंत झाला नसता का?  तो पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पैसे का घेतो? हा साधा प्रश्न आपल्याला पडत नाही. कारण पिढ्यान्पिढ्या आमच्या समाजात रक्तात अंधश्रद्धा भिनलेली आहे.

इतिहास असा दाखला देतो की, भयग्रस्त समाजात नेहमी अंधश्रद्धा रूपवते. या अफाट विश्वासात माणूस एकटा आहे मानवाची जीवन दुःखमय आहे, एकट्या मानवाची शक्ती विश्वातील भयानकतेला अपुरी पडणार आहे. याची जाणीव माणसाला अंधश्रद्धेकडे नेते मृत्यूची अपरिहार्यता माणसाला अंधश्रद्धेकडे खेचते.

 ग्रह, तारे, ग्रहण या सर्वांविषयी शास्त्रोक्त माहिती आज विज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. ग्रहणातील विविध स्थित्यंतरे आपण दूरदर्शन वरून पाहिली तरी आजही अंधश्रद्धेने ग्रहांविषयी अनेक चुकीच्या कल्पना आपण जोपासत असतो. अंधश्रद्धा या अल्पशिक्षितात असतो असे नाही तर उच्चशिक्षित व स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे कित्येक माणसे ही अंधश्रद्धेला कवटाळून बसलेली दिसतात. त्यामुळेच प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे बांधलेल्या जलावतरण नारळ फोडून करण्यात येते तसेच निवडणुकीचा अर्ज नवीन चित्रपटाची सुरुवात शुभमुहूर्त पाहूनच केलेले आढळते.

समाजमनाला वर्षानुवर्षे पोखरून टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करायची असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखे शेकडो नव्हे तर हजारो समित्या व संस्था पुढे यायला हवे यात त्यांनी सातत्याने हे काम करायला हवे तरच अंधश्रद्धेचा हा कलंक कायमचा पुसून टाकणं शक्य होईल.

अंधश्रद्धा एक शाप निबंध १०० ओळी  | Andhshradha Ek Shap Nibandh Marathi 100 Line

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon