Bharat Shakti Marathi: भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी “भारत शक्ती” सरावाच्या परीक्षण पाहण्यासाठी हजेरी लावलेले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील “पोखरण फायरिंग रेंजवर” भारत शक्ती सरावाचे साक्षीदार म्हणून पोहोचले.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत विकसित करण्यासाठी इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या महत्त्वावर भर दिलेला आहे. यादी आपण क्षेपणास्त्र इतर देशातून मागवत होतो व त्यासाठी कट्ट्यावधी रुपये देऊन अशी क्षेपणास्त्रे विकत घ्यावी लागत होते. पंतप्रधान मोदी यांचा आत्मनिर्भर भारत वर खूप विश्वास आहे त्यामुळे त्यांनी खाद्यतेला पासून ते आधुनिक विमानापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर भारतावर लक्ष केंद्रित करण्याचा विडा उचललेला आहे.
पोखरणच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दशकांमध्ये देशाचे संरक्षण उत्पादन दुपटीने वाढलेले आहे, याचे उत्पन्न एक लाख कोटीहून अधिक आहे. या यशामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तरुणांना त्यांनी श्रेय दिलेले आहे.
गेला दहा वर्षात दीडशेहून अधिक संरक्षण स्टार्टअप उदयास आलेले आहेत आणि सशस्त्र दलांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी 1800 कोटी रुपयांचे ऑर्डर दिलेली आहेत, असे पंतप्रधान यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत सशस्त्र दलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे.
1 thought on “‘Bharat Shakti’ सरावात पंतप्रधान मोदी यांची हजेरी!”