Goldman Sachs Marathi: 2027 मध्ये भारतातील श्रीमंत लोकांची संख्या 100 मिलियन पर्यंत पोहोचणार आहे आणि हा आकडा तीन वर्षांमध्येच वाढणार आहे असे एका रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर दहा करोड लोक 2027 मध्ये श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहेत. दहा करोड ही संख्या खूप मोठी आहे. दहा करोड ही काही देशांची लोकसंख्या आहे.
सध्या भारतातील मिडल क्लास फॅमिली ही श्रीमंत बनत चाललेली दिसत आहे आणि याचा वेग येणारा दशकापर्यंत असाच चालू राहणार आहे आणि हा रिपोर्ट Goldman Sachs या इन्व्हेस्टमेंट बँकेने दिलेला आहे. ही बँक अशा लोकांसाठी काम करते जे भरपूर श्रीमंत आहे आणि त्यांना पैसा कुठे ठेवावा आणि कसा वापरावा याविषयी माहिती देते किंवा त्यांच्या पैशांचे मॅनेजमेंट करते.
इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं झालं तर जेपी मॉर्गन (JP Morgan) ही अमेरिकेतील सर्वात मोठी बँक आहे तसेच ती जगातली देखील मोठी बँक आहे जी पैशाचे व्यवस्थापन करते.
Goldman Sachs या इन्व्हेस्टमेंट बँकेचे भारताबद्दल मत खूपच चांगले आहे. Goldman Sachs ही बँक इन्वेस्टर यांना सांगत असते की भारतामध्ये पैसा निवेश करा कारण की येणाऱ्या काळामध्ये भारताची इकॉनोमी खूप वेगाने वाढणार आहे आणि त्याचा फायदा आपल्यासारख्या गुंतवणूकदारांना होणार आहे.
Goldman Sachs या बँकेने एक लिस्ट काढलेली आहे जी येणाऱ्या काळामध्ये भरपूर रिटर्न्स देणार आहे. Goldman Sachs बँकेने एका अहवालात असे सांगितले आहे की लवकरच भारतातील मिडल क्लास फॅमिली श्रीमंत बनण्याच्या मार्गावर आहेत लवकरच भारतामधील मिडल क्लास लोक मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करणारा आहेत त्यामुळे येथे गुंतवणूक करणे येणाऱ्या भविष्यासाठी फायद्याचे ठरू शकते. त्यांच्या मते येणाऱ्या काळामध्ये भारतीय लोक ज्वेलरी, फूड आणि हेल्थ सारख्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहेत. त्यामुळे यासारख्या गोष्टी विकणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करून त्यावर मोठा प्रमाणात नफा कमवला जाऊ शकतो असा अंदाज Goldman Sachs इन्व्हेस्टमेंट बँकेने दर्शवलेला आहे.