Yoga Day in Marathi Language

वर्ष 2015 मध्ये प्रथमच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला गेला होता. Yoga Day in Marathi Language हा दिवस का साजरा केला जातो आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे हे आपण आजच्या आर्टिकल मध्ये सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.

Yoga Day in Marathi Language (जागतिक योग दिवस)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Yoga Day in Marathi Language (जागतिक योग दिवस) विषयी माहिती जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा केला जातो आणि प्रथम हा दिवस कोणत्या देशांमध्ये सुरू केला होता? योग दिवस कधी सुरू केला गेला? योग दिवसाची माहिती? योग दिवसाचे महत्व आणि योग दिवस इतिहास या सर्व गोष्टींविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

योग दिवसाची माहिती (International Yoga Day Information in Marathi)

दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग हा भारतीय शास्त्र मधून आलेला प्रकार आहे योगचे जन्मस्थान हे भारत आहे भारतातील ऋषी मनी पूर्वी आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग सारखे व्यायाम प्रकार करत असे (उदाहरणार्थ सध्या चे रामदेव बाबा यांचा योग आज जगामध्ये पसरलेला आहे) खऱ्या अर्थाने योगचे पुनरुज्जीवन स्वामी रामदेव बाबा यांनी घडवून आणलेले आहे स्वामी रामदेव बाबा हे योग गुरू म्हणून सुद्धा ओळखले जातात. रामदेव बाबा यांचे पतंजली योग हा आता विश्‍वभर पसरलेला आहे स्वामी रामदेव बाबा यांचे योग व्हिडिओ हे असता टीव्ही या वाहिनीवर खूपच लोकप्रिय झालेले दिसत आहे त्यासोबतच युट्युब वर सुद्धा स्वामी रामदेव खूप चर्चेमध्ये असतात स्वामी रामदेव बाबा यांनी गुहे मधला योग प्रकार जो काही काळ हरवलेला होता त्याला पुनरुज्जीवन करण्याचे काम स्वामी रामदेवबाबा यांनी केले आणि योगची पावर लक्षात घेऊन संपूर्ण विश्वाने योग या साधनेला महत्त्व दिलेले आहे त्यामुळेच दर वर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती (International Yoga Day in Marathi)

योग हा भारतातून आलेला एक व्यायामाचा प्रकार आहे पूर्वीच्या काळी भारतातील ऋषी म्हणी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग या गोष्टीचा वापर करत असे त्यानंतर हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मानी सुद्धा योग साधनेला महत्त्व दिले योग केल्याने शरीराची लवचिकता वाढते मन स्थिर राहते आणि शरीराचा संपूर्णपणे व्यायाम होतो त्यामुळे माणसाला आजार जडत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी फक्त योगमुळे घडून येतात भारतातील मल्लखांब आणि सूर्यनमस्कार हे सुद्धा योग चे प्रकार आहेत भारतातील अनेक थोर महान संत यांनी सुद्धा योग या साधनेवर भर दिलेला आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये आढळते. सध्या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये योग हा प्रकार खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे मोठमोठे हॉलीवुड एक्ट्रेस आणि ॲक्टर योग चे व्यायाम प्रकार करताना आपल्याला दिसतात. खऱ्या अर्थाने योग हा साधनेचा प्रकार जागतिक स्तरावर नेण्याचे काम भारतीय ऋषी-मुनी स्वामी रामदेव बाबा यांनी केलेले आहे त्यांनी डिजिटल मार्केटिंग द्वारे आपला पतंजली योग प्रकार संपूर्ण विश्व मध्ये पसरलेला आहे. ध्यान साधना करणे हासुद्धा एक योगचा प्रकार आपल्याला बुद्ध धर्मामध्ये बुद्धांचे अनुयायी ज्यांना आपण बुद्धिस्त माँक किंवा बुद्धांचे अनुयायी हे सुद्धा ध्यान साधनेचे द्वारे योगासन करत असतात. आपण नेहमी सिद्धार्थ गौतम बुद्धांची प्रतिमा पाहिली असेल ती नेहमी पद्मासन मुद्रे मध्ये असते आणि याच गोष्टीवरून आपण अंदाजा लावू शकतो की योग हा आपल्यात भारतात किती प्राचीन काळापासून चालत आलेला ध्यान साधनेचा एक प्रकार आहे. सध्या पाश्चिमात्य संस्कृती मध्ये योग फिटनेस बद्दल खूपच जनजागृती झालेली दिसत आहे जिम मध्ये तासंतास घाम गाळून शरीराला आकार देण्यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत घेतात पण योग सारख्या साधनेमुळे तुम्ही कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये सुद्धा तुमच्या शरीराची देखभाल करू शकता योग साधनेमुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते तसेच मन स्थिर राहते आणि माणसाचे शरीर आजारापासून मुक्त होते दररोज योग केल्याने शरीराला आकार मिळतो शरीराचे दुखणे कमी होते.

21 June Yoga Day in Marathi

दरवर्षी 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो सर्वात प्रथम हा दिवस वर्ष 2015 मध्ये साजरा केला गेला होता भारतीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशन मध्ये योग यांचे जागतिक महत्त्व लोकांना पटवून दिले होते त्यामुळेच युनायटेड नेशन ने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी दिली होती. भारतीय संस्कृतीचा योग हा एक अविभाज्य घटक आहे आणि संपूर्ण जगाने याची दखल घेतलेली आहे यामुळेच भारतीय संस्कृती किती प्रगत आणि प्रतिभाशाली आहे हे आपल्याला योग या साधने वरून कळते. भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये नवी दिल्ली येथे योग दिवस साजरा केला होता यामध्ये पंतप्रधान यांनी स्वतःहून योग साधने मध्ये भाग घेतला होता आणि त्यांचे योग संपूर्ण विश्व पाहत होते. भारतीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2014 पासून सत्तेत आल्यापासून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे झालेले दिसत आहे युनायटेड नेशन ने भारतीय संस्कृती मधला योग या प्रकाराला जागतिक परवानगी दिल्याने भारताची संस्कृती अजूनच महान झालेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंबली कौन्सिल मध्ये योग या दिवसाला आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून मान्यता द्यावी यासाठी युनायटेड नेशन मध्ये भाषण सुद्धा दिले होते. आणि त्यानंतरच दरवर्षी 21 June Yoga Day म्हणून साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय योग दिवस रेकॉर्ड (World Record Yoga Day in Marathi)

21 जून 2015 मध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये जागतिक योग दिवस साजरा केला गेला होता यामध्ये भारतीय पंतप्रधान मोदी यांनी स्वतःहून भाग घेतला होता आणि पहिल्याच दिवशी त्यांनी नवी दिल्ली राजपथ येथे अनेक युवक आणि युवती समवेत योग साधना केली होती आणि या पहिल्याच योग दिवस मध्ये भारतीय पंतप्रधान यांनी विश्व रेकॉर्ड (world record) केला होता. या योग दिनाच्या वेळी 35 हजार लोकांनी योग साधनेमध्ये भाग घेतला होता.

International Yoga Day Theme

  • 2015 सद्भाव शांती साठी योग Yoga for harmony and peace
  • 2016 तरुणांना एकत्रित करण्यासाठी Connect the youth
  • 2017 स्वास्थ्य साठी योग Yoga for health
  • 2018 शांती साठी योग Yoga for peace
  • 2019 पर्यावरण साठी योग Yoga for climate action
  • 2020 घरी योग Yoga at home

योग इतिहास (Yoga History in Marathi)

योग भारतामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेला अध्यात्मिक प्रकार आहे तसे पाहायला गेले तर 2014 पासून योग या दिवसाचे महत्त्व संपूर्ण जगाला कळलेले आहे पण आपल्या भारतात पूर्वीपासून म्हणजेच पाच हजार वर्षापासून योग हा प्रकार ऋषी मनी द्वारे केला जात असे. भारतामध्ये असे म्हटले जाते की जेव्हा माणसाची उत्क्रांती झाली तेव्हापासून योग हा माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होता. तसेच कुठल्याही धर्माची उत्पत्ती झाली नव्हती तेव्हापासून योग हा साधनेचा प्रकार मनुष्याशी जोडला गेलेला आहे. भारतीय साहित्यामध्ये भगवान शिव यांना सर्वात पहिले योगी पुरुष म्हटले गेलेले आहे भगवान शिव हे हिमालय पर्वतावर वास्तव्य करीत होते. सिंधू आणि सरस्वतीच्या घाटामध्ये अनेक जीवाश्म सापडले आहेत त्यामध्ये काही मुर्त्या सुद्धा सापडल्या होत्या त्यामध्ये त्या मुर्त्या योग मुद्रा मध्ये दिसल्या होत्या यावरून असा अंदाज लावता येतो की योग हा साधनेचा प्रकार भारतामध्ये फार पूर्वीपासून प्रचलित होता. भारतीय संस्कृतीमधील एक अविभाज्य घटक म्हणजे बौद्ध आणि जैन संस्कृतीमध्ये सुद्धा योग साधनेचे प्रमाण आढळल्याचे आपल्याला दिसून येते. वैदिक कालखंडामध्ये सूर्याला खूप महत्व दिले गेले होते योग साधनेमध्ये सूर्यनमस्कार हा सुद्धा योग साधनेचा प्रकार आहे. भारतातील महान संत ऋषी मनी महर्षी पतंजली यांनी सुद्धा योग साधणे वर भर दिला होता. इसवी सन पूर्व पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी योग साधनेसाठी सुवर्णकाळखंड होता. या काळामध्ये योग संपूर्ण भारत मध्ये विस्तारलेला होता.

1700 ते 1900 शतकामध्ये योग आधुनिक काळामध्ये योग या साधनेचे पुनरुज्जीवन झाले यामध्ये महान संत आणि तपस्वी योगी सुद्धा होते त्यामध्ये स्वामी विवेकानंद हेच खूप मोठे नाव आहे स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा इतिहास संपूर्ण जगाला सांगितला होता. एकोणिसाव्या शतकानंतर भारतामध्ये योग साधनेला खऱ्या रूपाने जागतिक स्तरावर नेण्याचे काम बी के एस अय्यंगार यांनी केले त्यांच्यानंतर स्वामी रामदेव बाबा यांनी खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य केले आज त्यांची पतंजली ही संस्था लाखो लोकांना योग अभ्यास कसा करावा याचे प्रशिक्षण देते.

2020 आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2020 in Marathi)

वर्ष 2015 पासून चे योग दिवस संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो पण सध्या covid-19 यासारख्या विषाणूमुळे प्रत्येक देशांमध्ये Lockdown असल्या कारणामुळे वर्ष 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस हा घरच्या घरी साजरा केला गेला होता आणि या दिवसाची Theme Yoga at Home ही होती. वर्ष 2020 मध्ये योग दिवसा डिजिटल पद्धतीने साजरा केला गेला होता यामध्ये Facebook WhatsApp Instagram यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांना कनेक्ट होऊन योग दिवस साजरा केला होता.

योग करण्याचे फायदे (Benefits of Yoga in Marathi)

योग हा भारतीय संस्कृतीचा एक घटक आहे पूर्वी भारत यासारख्या कलामुळे संपूर्ण विश्वामध्ये विश्वगुरू होता योग हे प्रकार भारतीय संस्कृती मधून आलेले आहेत. शरीराला स्वस्थ आणि अध्यात्मिक ठेवण्यासाठी पूर्वी लोक योग साधनेचा उपयोग करत असे सध्या आधुनिक जगामध्ये योग या विषयी लोकांची लोकप्रियता खूप वाढलेले आहे त्यामुळेच आपण माहिती करून घेत आहोत की योग करण्याचे काय काय फायदे मनुष्य शरीराला होतात.

1. योग साधनेचे प्रयोग पूर्वी मन शांत ठेवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहावे म्हणून करण्यात येत होता आज शास्त्रज्ञांनी सुद्धा हे मान्य केले आहे की मन स्थिर ठेवण्यासाठी योग हा खूपच प्रभावकारी घटक आहे.

2. योगसाधनेमुळे मानवी शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

3. साधना केल्यामुळे शरीराची त्वच्या टवटवीत राहते तसेच शरीराला एक वेगळा आकार प्राप्त होतो आणि शरीर लवचिक बनते.

4. योगसाधनेमुळे मास पेशी मध्ये ताकद निर्माण होते शरीर मधील चरबी कमी होण्यास मदत होते.

5. योग केल्यामुळे तुमची ध्यान साधना चांगली राहते तुम्ही कुठलेही काम लक्ष केंद्रित करून करू शकता.

International Day of Yoga Coin Price

वर्ष 2015 मध्ये भारत सरकारने International Yoga Day वित्त भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दहा रुपयाचे कॉइन (₹10 coin) त्यावर International Day OF Yoga Celebration असे अनेक कॉईन बाजारामध्ये उतरवले होते आज या coin value ₹2000 रुपयाच्या घरांमध्ये आहे असे काही currency export त्यांचे मत आहे भारतीय रिझर्व बँकेने Bhartiya Sanskriti पाया असलेला योग या साधनेला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले म्हणून या coin ची निर्मिती केली होती. या coin वर आंतरराष्ट्रीय योग दिवस International Day Of Yoga असे लिहिले होते तसेच या कॉईन वर योग करताना ची मुद्रा दर्शवली गेली होती आणि त्यावर असे लिहिले होते सामंजस्य एव शांति के लिए योग Yoga For Harmony And Peace असे लिहिले गेले होते. सध्या हा कॉइन बाजारांमध्ये खूपच कमी चलनामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचे कारण असे की काही लोकांच्या मते आंतरराष्ट्रीय योग डे निमित्त प्रचलित केलेला हा coin खूपच महाग आहे याची बाजार मूल्य किंमत दोन हजार रुपयेच्या घरात आहे.

सामंजस्य एव शांति के लिए योग 2015

सरकारने वर्ष 2015 मध्ये योगमुद्रा असलेला दहा रुपये असलेला कॉईन बाजारामध्ये आणला होता प्रथमच 2015 मध्ये विश्व योग दिवस साजरा केला गेला होता त्या दिवसाची आठवण म्हणून हा coin वितरित करण्यात आला होता या coin वर सामंजस्य एव शांति के लिए योग असे लिहिले गेले होते.

#YogaDay

दरवर्षी भारतामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून #yogaday ट्रेंड चालवला जातो यामध्ये मोठमोठे सेलिब्रेटी सुद्धा सहभाग घेतात आणि आपले योग करताना चे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसतात यामध्ये प्रामुख्याने Twitter, Instagram and Facebook या सारख्या सोशल मीडियाचा जास्त वापर होताना आपल्याला दिसत आहे तसेच आता युट्युब वर सुद्धा काही लोक आपले योग करतानाचे व्हिडिओ सुद्धा शेअर करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

FAQ

Q: आंतरराष्ट्रीय योग दिवसला मान्यता कधी मिळाली.
Ans: 21 जून 2015 आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता दिली गेली.

Q: आंतरराष्ट्रीय योग दिवस 2020 theme
Ans: घरीच योग (Yoga at home)

Q: भारतामध्ये योग दिवस कसा साजरा केला जातो?
Ans: भारतामध्ये योग दिवस हा संपूर्ण कुटुंबासमवेत साजरा केला जातो.

Q: Yoga Day Logo 2021
Ans:

Conclusion,
Yoga Day in Marathi language (जागतिक योग दिवस) आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Yoga Day in Marathi language

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon