जागतिक मानसिक आरोग्य दिन: “World Mental Health Day 2022 Marathi” Theme, History, Significance #worldmentalhealthday2022
World Mental Health Day 2022: आजच्या आर्टिकल मध्ये आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 10 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया मानसिक आरोग्य दिन इतिहास, थीम आणि महत्त्व विषयी माहिती.
World Mental Health Day 2022: Marathi
गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आरोग्याविषयी चर्चेत हळूहळू वाढ होत आहे जेव्हा साथीच्या रोगाने देशावर lockdown लावण्याची परिस्थिती आणली अशा स्थितीत शारीरिक आरोग्य व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची चिंता मानसिक आरोग्याची होती. लोक काम न करता घरी बसले होते आणि यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यातल्या काहींनी आत्महत्या केल्या. नैराश्य, चिंता आणि इतर विविध मानसिक आजारातून जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.
World Mental Health Day 2022: History
जागतिक मानसिक आरोग्य दिन 2022: इतिहास
आजकाल लोक मानसिक आरोग्याबाबत जागरूक आणि संवेदनशील झालेले आहेत. ही समस्या ओळखण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ (World Federation of Mental Health) ने अधिकृतपणे या दिवसाची स्थापना केली आणि तेव्हापासून दर वर्षी 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
World Mental Health Day 2022: Theme
जागतिक मानसिक आरोग्य दिन 2022: थीम
2022 चे जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम “असमान जगात मानसिक आरोग्य” ही आहे. हे मानसिक आरोग्यासाठी जागतिक फाउंडेशनने अधिकृतपणे घोषित केलेले आहे.
World Mental Health Day 2022 Theme: “Meatal Health in an Unequal World”
जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी ’10 ऑक्टोंबर’ रोजी साजरा केला जातो.
जागतिक मानसिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?
आजच्या बदलत्या काळामध्ये बदलती जीवनशैलीमुळे माणसाच्या मनावर नैराश्य वाढत चाललेले आहे. तसेच धावपळीचे जीवन, कामाचा त्रास, तणाव असलेले जीवन या सर्व गोष्टींमुळे माणसाचे मानसिक संतुलन बिघडत आहे या बिगड त्या मानसिक असंतुलनामुळे जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्यास परवानगी दिली आहे.