आजच्या आर्टिकल मध्ये आपण World Environment Day Information in Marathi का साजरा केला जातो याची माहिती जाणून घेणार आहोत.
World Environment Day Information in Marathi
World Environment Day दरवर्षी 5th June साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात United Nation ने केलेली आहे . युनायटेड नेशनचे असे म्हणणे आहे की आधुनिक काळामध्ये होत असलेला पर्यावरणाचा हास या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा त्यामुळे पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली आहे.
पर्यावरण म्हणजे काय? (Environment)
आपण सभोवतालच्या जागेमध्ये राहतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहतो त्याचे अवतीभोवतीचे वातावरण म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरण म्हणजेच सजीव निर्जीव यासारख्या गोष्टींचे ताळमेळ एकत्र करून ठेवणारी गोष्ट यालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये पर्यावरण आणि इंग्लिश मध्ये Environment असे म्हणतो पर्यावरणाची व्याख्या व शास्त्रीय भाषेमध्ये थोडी वेगळी असली तरी आपल्याला आपल्या आधुनिक भाषेमध्ये आपल्या सोयीनुसार बनवतो.
पर्यावरणाची व्याख्या
मराठी शब्दातील पर्यावरणाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नेसर्गिक परिसर पर्यावरण असे म्हटले जाते वैज्ञानिक भाषेमध्ये पर्यावरणाचे स्वरूप म्हणजे वनस्पती, प्राणी, हवा, तापमान यासारख्या गोष्टींचा पर्यावरणामध्ये उल्लेख केला जातो. तसेच वैज्ञानिक भाषेमध्ये पर्यावरणाचे 3 भाग पडले जातात त्यामध्ये
- शिलावरण
- जलावरण
- जिवावरण
- वातावरण
असे तीन घटक पर्यावरणामध्ये मोडतात.
“माणसाच्या सभोवताली असलेले वातावरण (उदाहरणार्थ: वनस्पती, प्राणी, सजीव, हवा, तापमान, पाणी इ.) गोष्टी पर्यावरणामध्ये येतात आणि यालाच आपण पर्यावरण म्हणतो”
वर्ल्ड एनवोर्मेन्ट डे ची सुरुवात कशी झाली? (How did World Environment Day Get Started)
समाजामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी वर्ष 1972 मध्ये पर्यावरणा विषयी युनायटेड नेशन मध्ये एक ठराव संमत झाला. पर्यावरणाचे होणारे हास, बदलते ऋतू, वातावरण या सगळ्या गोष्टीचा आपल्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन युनायटेड नेशन ने वर्ष 1974 मध्ये पर्यावरणासंबंधी जनजागृती करण्यासाठी World Environment Day ची स्थापना केली. वाढते शहरीकरण, औद्योगीकरण पर्यावरणाचा होत असलेला निष्काळजीपणे वापर, जंगलांची होत असलेली कत्तल, ग्रीन हाऊसचे वाढते प्रमाण, त्यासोबतच कार्बनचे होणारे अति उत्सर्जन यामुळे आपले पर्यावरण धोक्यात आलेले आहे.
विश्व पर्यावरण दिवसाच्या दिवशी काय करतात?
विश्व पर्यावरण या दिवशी पृथ्वीतून उत्पन्न होणारे ग्रीन हाऊसेस गॅस कमी केले जातात तसेच कार्बनचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जातो तसेच इको फ्रेंडली गोष्टींना प्राधान्य दिले जाते ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती घडवून आणली जाते तसेच पडीक राहिलेल्या जमिनीवर वृक्ष रोपण केले जाते मिथेन गॅस चे प्रमाण कमी होईल असे वृक्ष पर्यावरण दिवसाच्या दिवशी लावले जात आहे.
पर्यावरण थीम 2021 (Environment Theme 2021)
या वर्षी 5 जून 2021 ला पर्यावरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळची पर्यावरण थीम थोडीशी वेगळी असणार आहे संपूर्ण विश्व कोरोनाव्हायरस सारखे व्हायरस मुळे त्रस्त झालेले आहे त्यामुळे या वर्षी पर्यावरण थीम मध्ये थोडासा बदल केलेला आहे या वर्षी पर्यावरण थीम मध्ये “Ecosystem Evolution” घडून आणली जाणार आहे. यावर्षी पाकिस्तान वर्ल्ड इन्व्हरमेंट डे Host करणार आहे प्रत्येक वर्षी World Environment Day Hosting वेगवेगळे देश करत आहे यावर्षी “Ecosystem Revolution” वर संयुक्त राष्ट्राचे एक दशक लॉन्च केले जाणार आहे. वर्ष 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राने पर्यावरण आणि प्रदूषण यावर लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी स्वीडनमध्ये स्टॉक होम येथे पहिले पर्यावरण संमेलन आयोजित केले होते. या संमेलनामध्ये जवळजवळ 119 देशांनी सहभाग घेतला होता त्यानंतर प्रत्येक वर्षी 5 जूनला ‘विश्व पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी विश्व पर्यावरण दिवस याचे संमेलन वेगवेगळ्या देशांमध्ये भरवली जाते यावर्षी पाकिस्तान मध्ये विश्व पर्यावरण दिनचे संमेलन होणार आहे.
पृथ्वीच्या पर्यावरणावर सर्वात जास्त प्रभाव कोणत्या गोष्टीचा आहे?
सर्व साधारणपणे मानवनिर्मित प्लास्टिक ही पर्यावरणाला लागलेली कीड आहे कारण कि, प्लास्टिक हे मानवनिर्मित असून त्याला नष्ट करता येऊ शकत नाही त्यामुळे प्लास्टिकचे उत्पादन सध्या होत नसले तरी ती नष्ट केली जाऊ शकत नाही आणि हाच खूप मोठा गंभीर प्रश्न व पर्यावरणास समोर उभा राहिलेला आहे. एवढेच नव्हे तर प्लॅस्टिक सारखा पदार्थ समुद्राच्या तळ्यामध्ये सुद्धा आहे तसाच राहू शकतो समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा याचा वर काहीही परिणाम होत नाही तसेच 100 वर्षापूर्वी पडलेले प्लास्टिक सुद्धा आज काढायला गेले तर ते तसेच्या तसेच असलेले आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे प्लास्टिक ही खूपच मोठी गंभीर समस्या सध्या पृथ्वीच्या पर्यावरणात निर्माण झालेली आहे. एका अहवालाच्या निकषांनुसार भविष्यामध्ये आपल्याला प्लास्टिक पासून खूप मोठे नुकसान होणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे तसेच प्लास्टिक येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीचे कितीतरी टक्के क्षेत्र व्यापून टाकणार आहे आणि यासाठीच युनायटेड नेशन ने काही गाईडलाईन्स संपूर्ण जगाला दिलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आता प्लास्टिकचा कचरा साचलेला आहे.
ग्रीनहाउस पर्यावरणाला कशाप्रकारे घातक आहे?
सूर्या मधून येणारी किरणे जेव्हा आपल्या पृथ्वीवर पडतात त्यामधले काही भाग घोषित केला जातो तर काही भाग हा अंतरिक्ष मध्ये परिवर्तित केला जातो. वातावरणामध्ये असलेली ग्रीनहाउस वायू काही प्रमाणात सूर्याची किरणे शोषून घेतात त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागते वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे निसर्गचक्र बिघडते त्यामुळे पृथ्वीवर असंतुलन निर्माण होते पृथ्वीच्या असंतुलनामुळे निसर्ग चक्रामध्ये बदल घडून येतात त्यामुळे पूर, अतिवृष्टी, कडक उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आलेले दिसतात आणि हे बदल दिल्ली प्रमाणे मानवी जीवनावर तसेच इतर सजीव घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात त्यामुळे पृथ्वीचे संतुलन ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे.
दिवाळी आणि पर्यावरण?
तसे पाहायला गेले तर भारतीय संस्कृतीमध्ये सणांचा खूप मोठा वारसा आहे भारतीय संस्कृती महान संस्कृती आहे त्यासोबतच याच्यामध्ये काही त्रुटी सुद्धा आहेत सध्या त्रुटी पर्यावरणाला घातक बनत आहेत उदाहरणार्थ दिवाळी हा सण या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये फटाके वाजवले जातात या फटाक्यांमुळे अगिणत वातावरण दूषित होते तसेच या गोष्टींचा पक्ष्यांना सुद्धा त्रास होतो काही पक्षी फटाक्यांच्या आवाजाने मृत्युमुखी पडतात तसे पाहायला गेले तर दिवाळीला फटाके वाजवण्याची संस्कृती अलीकडेच आलेली आहे यापूर्वी दिवाळीमध्ये घराच्या समोर तेलाच्या पणत्या लावून दिवाळी साजरी केली जात असे फटाक्यांचा इतिहास खूप प्राचीन आहे असे नाही फटाक्यांचा शोध सर्वात प्रथम चायना मध्ये लागला होता दिवाळीमध्ये फटाके वाजवल्या मुळे खूप ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण होते दरवर्षी आपण दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचतो या या राज्याचे वातावरण दूषित झालेले आहे उदाहरणार्थ दिल्लीसारखी राज्याचे वातावरण हे नेहमीच धोक्याचे असते याचे कारण दोन आहेत एक म्हणजे दिल्ली ही एक औद्योगिक शहर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येथील लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे स्वतः तसेच दळणवळणाचे साधन आहे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःची गाडी आहे या सर्वच गोष्टींचा दिल्लीच्या वातावरणावर मोठा परिणाम झालेला आहे दिवाळीसारख्या दिवसांमध्ये दिल्लीचे वातावरण खुपच खराब होते त्यामुळे अशा वातावरणामध्ये माणसाचा मृत्यू दम्यासारख्या आजाराने होऊ शकतो.
पर्यावरण आणि मास मिशन
इलॉन मस्क ही जगातील सर्वात शक्तिशाली लोकांमधील एक आहेत आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे ते जगामध्ये ओळखले जातात त्यासोबत ते Space X या कंपनीचे CEO सुद्धा आहेत त्यांनीच असा निष्कर्ष काढला आहे की येत्या काही वर्षांमध्ये पृथ्वी ही माणसांना राहण्यायोग्य राहणार नाही त्यामुळेच आता आपल्याला पृथ्वीसारखे इतर ग्रह शोधावे लागतील त्यामुळे त्यांनी आपल्या विजन मधून SPACE X नावाची कंपनी सुरू केली तसेच या कंपनीच्या माध्यमातून ते लोकांना मंगळ ग्रहावर स्थायी करणार आहेत या सर्व गोष्टी सध्या आपल्याला मजेशीर वाटतात पण येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी खरंच घडणार आहेत जर तुम्हाला या गोष्टी डिटेल्समध्ये माहिती जाणून घ्यायचे असतील तर हॉलीवूड मध्ये काही दर्जेदार चित्रपट या विषयावर बनवले गेलेले आहेत उदाहरणार्थ Interstellar Movie हा चित्रपट याच गोष्टीचे वर्णन करणार आहे या चित्रपटांमध्ये पृथ्वी ही आता कशी धोकादायक बनत चाललेली आहे हळूहळू पृथ्वीवरून मानवी जीवन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तसेच आता पृथ्वीवर जीवन उदार निर्वाह करण्यासाठी रिसोर्सेस खूपच प्रमाणात उरलेले आहेत आणि आता टेक्नॉलॉजी सारख्याच गोष्टीला लोकं वैतागलेली आहेत ही गोष्ट या चित्रपटांमध्ये दाखवली गेलेली आहे या गोष्टीचे काही वर्षांमध्ये सत्यात रुपांतर होणार आहे त्यामुळे पृथ्वीची जागा आता इतर ग्रह घेणार आहेत इलॉन मस्क ने या गोष्टीची सुरुवात आता केलेली आहे लवकरच इलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्स मंगळ ग्रहावर माणसांना घेऊन जाणार आहेत.
पर्यावरण आणि मानव
पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून नैसर्गिक पर्यावरण पृथ्वीवर आहे निसर्गाच्या सृष्टी मुळेच पृथ्वीवर हवा, तापमान, पाणी, वनस्पती, प्राणी निर्माण झालेले आहेत त्यामध्ये मानवाचा सुद्धा समावेश आहे पर्यावरणाचा आणि मानवाचा पूर्वीपासूनचा संबंध आहे जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच माणूस पर्यावरणाशी अनुकूल राखायला सुरुवात केली
“असे म्हणतात की मानवी जीवनाची उत्पत्ती ही आफ्रिका खंडात पासून झाली आहे आणि आफ्रिकेतून माणूस नंतर हळू हळू संपूर्ण विश्वभर पसरला”
त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की जसे पृथ्वीचा नैसर्गिक पर्यावरण बदलत गेले त्यानुसार मानवाने सुद्धा आपल्याला बदले त्यामुळे मानवाचा आणि पर्यावरणाचा पूर्वीपासूनच संबंध आहे मानवाला जे पर्यावरण अनुकूल वाटले त्या पर्यावरणामध्ये माणूस स्थायिक झाला. (उदाहरणार्थ: युरोप खंड, अशिया खंड, आफ्रिका खंड आणि अमेरिका खंड) यासारख्या खंडांमध्ये मानवाने आपले वास्तव्य निर्माण केलेले आहे आपल्या जगण्याच्या आवडीनिवडीप्रमाणे मनुष्याने आता आपले वास्तव्य व इतर खंडांमध्ये केलेले आहे.
“अमेरिकेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला भारताचे वातावरण सहन होऊ शकत नाही तर भारतामधील व्यक्तींना अमेरिकेमधील कडाक्याची थंडी सहन होऊ शकत नाही”
प्राचीन काळापासूनच मानवाने आपल्या सोयीनुसार त्या-त्या देशांमधल्या वातावरणामध्ये आपले वास्तव्य निर्माण केलेले आहे नैसर्गिक पर्यावरणात नुसार माणूस आपले आयुष्यात जगत आलेला आहे आणि नैसर्गिक पर्यावरण हे नेहमी बदलत असलेले चक्र आहे त्यामुळे माणूस सुद्धा या बदलत्या चक्रामुळे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
FAQ
Q: वातावरणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
Ans: वातावरणाला इंग्लिश मध्ये (environment) असे म्हणतात.
Q: भारताच्या क्षेत्रफळावर किती टक्के वन आहेत?
Ans: भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 24.39% क्षेत्र वनांखाली आहे.
Q: आता भारतामध्ये Environment रिपोर्ट कोण बनवतो?
Ans: The Ministry of Environment, Forest and Climate Change – MoEFCC)
Q: 2021 ची पर्यावरण थीम काय आहे?
Ans: 2021 ची पर्यावरण थीम “Ecosystem Revolution” आहे.
Q: पर्यावरण संबंधित कोणकोणते दिवस आहेत?
Ans: पर्यावरण संबंधित चार दिवस आहेत
1. विश्व ब्रेल दिवस (4 जानेवारी)
2. विश्व वन दिवस (21 मार्च)
3. विश्व नमभूमी दिवस (2 फेब्रुवारी)
3. विश्व जल दिवस (22 मार्च)
Q: सर्वात प्रथम पर्यावरण दिवस कधी साजरा केला गेला?
Ans: 1972 मध्ये सर्वप्रथम पर्यावरण दिवस यावर चर्चा करण्यात आली नंतर वर्ष 1974 मध्ये 5 जूनला सर्वात प्रथम विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.
Q: विश्व पर्यावरण दिवस 2021 मेजबान देश?
Ans: 2021 मध्ये पाकिस्तान मध्ये विश्व पर्यावरण दिवस संमेलन होणार आहे.
Q: कोणत्या वर्षापासून विश्व पर्यावरण दिवस साजरा केला गेला?
Ans: 1972 मध्ये या गोष्टीवर चर्चा करण्यात आली आणि 1974 मध्ये 5 जूनला हा दिवस साजरा करण्यात आला.
Conclusion,
World Environment Day Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “World Environment Day Information in Marathi”