लवकर ‘चंद्रयान 3‘ हे मिशन भारत सरकार तर्फे आयोजित करण्यात येणार आहे. हे मिशन 13 जुलै रोजी प्रक्षेपित करण्याची तयारी भारत सरकारची आहे. आज चंद्रयान असलेले आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये LVM3 सोबत जोडले गेलेले आहे अशी माहिती इस्रो (ISRO) ने दिलेली आहे.
चंद्रयान पृथ्वीचे एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्राची भूगर्भशास्त्राची माहिती गोळा करण्यासाठी चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. ज्यामुळे आपल्याला चंद्राच्या पार्श्वभूमीची माहिती मिळेल. या मोहिमेची उत्सुकता संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळत आहे. चंद्राच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करणारे ‘चंद्रयान 3’ हे एकमेव चंद्रयान असणार आहे असे शास्त्रज्ञानद्वारे सांगण्यात येत आहे.
चंद्रयान तीन मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राचा शोध घेर आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करेल आणि हे सिद्ध करून दाखवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.