आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलाचे गीत ऐकावे असे कान नाहीत माझे, चंद्र सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे हृदय आहे माझे. तिळगुळ घ्या गोड बोला.
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा दुःखाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!