भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
डॉ.सी. व्ही. रमण यांच्या (Raman Effect) शोधाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.
"सर चंद्रशेखर वेंकट रमण" यांना रामन इफेक्ट या शोधासाठी 'नोबल पारितोषिक' मिळाले होते आणि तसेच त्यांना भारतातील सर्वोच्च नागरिक सम्मान 'भारतरत्न' देखील मिळाले होते.
विज्ञान क्षेत्रात दिलेल्या या बहुमोल योगदानासाठी भारत सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची मंजुरी दिली.
हा प्रस्ताव सर्वात प्रथम राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेने 1986 मध्ये मांडला होता नंतर भारत सरकारने 1987 रोजी मान्यता दिली आणि तेव्हापासून आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो.
राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे लोकांमध्ये विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणे आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.