Twitter New Logo: इलोन मस्क (Elon Musk) यांची मुक्तदारी असलेल्या ट्विटरवर आता चिमणी ऐवजी कुत्र्याचा लोगो दिसणार आहे. इलोन मस्क यांनी केलेल्या या छोट्याशा बदलामुळे डॉग कॉईन करन्सी मध्ये मोठी तेजी आल्याची दिसून येत आहे.
Twitter New Logo Marathi
इलोन मस्क यांची भागीदारी असलेल्या ट्विटर वर असलेल्या लोगोत मध्ये बदलाव केलेला आहे त्यामध्ये आता तुम्हाला डॉग दिसणार आहे हा डॉग यांचीच कंपनी असलेल्या डॉक कॉइन या लोगोचा फोटो असणार आहे.
ट्विटरने त्यांची निवळी चिमणी काढून (Blue bird of Twitter) कुत्र्याचा लोगो लावलेला आहे. सोमवारी रात्री झालेल्या या बदलामुळे सर्वच ट्विटरचे युजर हेरण झालेले आहे. इलोन मस्क केलेल्या या छोट्याशा बदलामुळे डॉग कॉईन या डिजिटल करन्सी मध्ये मोठ्या प्रमाणात तेजी निर्माण झाल्याची दिसत आहे. त्यामुळे सोमवारी #DOGE ट्विटरवर ट्रेडींगमध्ये मध्ये असल्याचे दिसत होते.
इलॉन मस्कचे ट्विट रात्री उशिरा आले तेव्हा समजले की, ट्विटर हॅक झाले नसून, त्यात स्वतः ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा हात आहे. मस्कने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये कारच्या ड्रायव्हिंग सीटवर कुत्रा बसला होता. आणि ट्रॅफिक पोलिसाच्या हातात एक परवाना होता, त्यावर निळ्या पक्ष्याचा फोटो होता. कुत्रा म्हणत होता की हा जुना फोटो आहे. मस्कच्या या पोस्टवरून त्यांनी ट्विटरचा लोगो बदलल्याचे दिसते. आता ट्विटरवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसणार आहे. सोमवारी पहाटे मस्क यांनीही अशीच पोस्ट केली होती.