Today Astrology in Marathi: 20 March 2023 (Daily Horoscope, Rashi, Bhavishya, Rashifal) #todayhoroscope
Today Astrology in Marathi 20 March 2023
आजचे राशि भविष्य: आज आपण “20 मार्च 2023 राशि भविष्य” बद्दल माहिती जाणून घेत आहोत. आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवून येणार आहेत. आजचा दिवस कसा असणार आहे (शुभ की अशुभ) याविषयी आपण जाणून घेऊ.
मेष राशि (Mesh Rashi)
स्वप्न पूर्ण होतील:
ज्या व्यक्तींची राशी मेष आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. विशेषतः महिलांसाठी हा दिवस खूपच खास असणार आहे. कारण की खूप दिवसापासून मनात असलेली इच्छा आज पूर्ण होणार आहे.
वृषभ राशि (Vrushabh Rashi)
मानसन्मान वाढेल:
ज्या व्यक्तींची राशी ऋषभ आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस शुभ असणार आहे. विशेषतः कर्मचारी वर्गासाठी आजचा दिवस खास असणार आहे कारण की कामाच्या ठिकाणी आज तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जाणार आहे.
मिथुन राशि (Mithun Rashi)
समृद्धी येईल:
ज्या व्यक्तींची राशि मिथुन आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूपच खास असणार आहे. बऱ्याच काळापासून डोक्यावर असलेले ओझे समाप्त होणार आहे. घरामध्ये आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे वातावरण असेल.
कर्क राशि (Kark Rashi)
आर्थिक स्थिती सुधारेल:
ज्या व्यक्तींची राशि कर्क आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस सकारात्मक असणार आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळणार आहे. आर्थिक संकटे समाप्त होणार आहेत. आर्थिक धनलाभ मिळणार आहे. प्रॉपर्टी सारख्या ठिकाणातून आर्थिक धनलाभ होईल.
सिंह राशि (Shinh Rashi)
नवीन आयुष्याची सुरुवात:
ज्या व्यक्तींची राशी सिंह आहे या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः युवा वर्गासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे कारण की तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यामध्ये तुम्हाला चांगले फळ देणार आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरू शकतो.
कन्या राशि (Kanya Rashi)
कुटुंबात मानसन्मान वाढेल:
ज्या व्यक्तींची राशि कन्या आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा दिवस खूपच खास असणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय हे तुमच्या व्यापारासाठी नेहमीच योग्य असणार आहे, त्यामुळे कुटुंबामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल त्यासोबतच मानसन्मान देखील वाढेल.
तूळ राशि (Tula Rashi)
अडचणी निर्माण होतील:
ज्या व्यक्तींची राशि तूळ आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस थोडासा तणावाचा असणार आहे. विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा दिवस थोडासा त्रासदायक ठरू शकतो. व्यापाराच्या ठिकाणी आर्थिक नुकसान होऊ शकते, तसेच कुटुंबामध्ये पैशांवरून वादविवाद निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक राशि (Vruchik Rashi)
निराश्य वाढेल:
ज्या व्यक्तींची राशि वृश्चिक आहे अशा व्यक्तींसाठी हा अशुभ असणार आहे. विशेषतः नवयुवकांसाठी हा दिवस थोडासा तणावाचा असेल. तसेच नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी देखील हा दिवस थोडासा नकारात्मक असेल. त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करा.
धनु राशि (Dhanu Rashi)
जोडीदाराकडून आपुलकीची साथ:
ज्या व्यक्तींची राशी धनु आहे अशा व्यक्तींसाठी हा दिवस शुभ असणार आहे. वैवाहिक जीवन मधुर राहणार आहे. खूप दिवसापासून कुटुंबात असलेली समस्या समाप्त होणार आहे. जोडीदाराकडून आपुलकीची साथ मिळणार आहे.
मकर राशि (Makar Rashi)
नवीन संधी निर्माण होतील:
ज्या व्यक्तींची राशि मकर आहे त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषतः कर्मचारी वर्गासाठी हा दिवस खास असणार आहे. आज तुमच्या अंगावर एक महत्त्वाची जबाबदारी येणार आहे ज्याचे स्वागत तुम्ही खंबीरपणे करणार आहात. तुम्हाला मिळालेल्या संधीचे तुम्ही सोने करणार आहात.
कुंभ राशि (Kumbh Rashi)
आरोग्य समस्या निर्माण होतील:
ज्या व्यक्तींची राशी कुंभ आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस चिंताजनक ठरू शकतो. प्रकृतीमध्ये अचानक बदल घडून येतील. आरोग्य संबंधित समस्या उद्भवू शकतात. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे आजच्या दिवशी महत्त्वाचे आहे. विशेषतः खानपानावर लक्ष देणे महत्त्वाचे.
मीन राशि (Min Rashi)
स्वप्नाच्या दिशेने वाटचाल:
ज्या व्यक्तींची राशी मीन आहे त्याच्यासाठी हा दिवस शुभ असणार आहे. विशेषतः महिलांसाठी हा दिवस खास असणार आहे. खूप दिवसापासून मनात असलेली इच्छा आज तुम्ही पूर्ण करणार आहात तसेच स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहात.