Bing Image Creator : सध्या “AI” बोलबाला इतका वाढला आहे की प्रत्येक जण AI च्या मदतीने स्वतःचा बिझनेस चालू करण्याचा विचार करत आहे, तसेच AI वापरण्याचा फायदा म्हणजे खूपच कमी वेळामध्ये तुम्ही माहिती आणि तुमची महत्त्वाची कामे करू शकता.
वर्ष 2022 मध्ये जेव्हा “ChatGPT” बाजारामध्ये आला तेव्हा AI चे प्रमाण खूपच वाढलेले दिसले ‘Google‘ सारखा मोठा जॉईंट नेटवर्क देखील ChatGPT ला टक्कर देण्यासाठी आपला AI “Bard” बाजारात घेऊन आला.
सध्या मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनी देखील याच शर्यतीमध्ये उतरताना दिसत आहे लवकरच मायक्रोसॉफ्ट ने “Bing Image Creator” नावाने AI सॉफ्टवेअर सुरू केलेले आहे. ज्याच्या मदतीने युजर आपल्याला हव्यात अशा मनाप्रमाणे इमेज (Image) बनवू शकतील यामध्ये फक्त तुम्हाला तुमच्या मनामध्ये कशी प्रतिमा पाहिजे याविषयी माहिती द्यावी लागेल त्यानुसार बिग इमेज क्रिएटर (Bing Image Creator) तुम्हाला ती इमेज बनवून देईल आणि हे काम खूपच क्षणामध्येच होते त्यामुळे सध्या Bing Image Creator चा मार्केटमध्ये बोलबाला सुरू झालेला आहे.
सध्या AI च्या मदतीने छोटे छोटे व्यवसाय देखील सुरू होत आहे.