Tejas plane accident – तेजस विमानाचा झाला अपघात!
भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसचा अपघात झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. भारतीय वायुसेनेचे तेजस हलके लढाऊ विमान (LCA) मंगळवारी, 12 मार्च 2024 रोजी राजस्थान मधील जैसलमेर जवळ कोसळले. हे ऑपरेशन ट्रेनिंग सॉर्टी दरम्यान चालू होते, या स्वदेशी बनावटी तेजस चा हा पहिला अपघात होता.
सुदैवाने पायलट सुरक्षित बाहेर पडला आणि जमिनीवर कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
अपघाती जागा पोखरण पासून सुमारे 100 किमी अंतरावर होती येथे त्यावेळी “भारत शक्ती” हा मोठा लष्करी सराव चालू होता.
हा सराव पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे उपस्थित होते.
या अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश दिलेले आहेत.
तेजस हे विमान IAF साठी एक शक्तिशाली प्लॅटफॉर्म आहे जे हवाई युद्ध सामर्थ्य दुय्यम भूमिका म्हणून आणि जहाज विरोधी ऑपरेशन साठी डिझाईन केलेले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे तेजस ची निर्मिती केलेली आहे.
भारत शक्ती काय आहे?
भारत शक्ती हा भारताचा एक लष्करी सराव आहे जो भारतीय सशस्त्र दलाने आयोजित केलेला आहे. हा सराव 12 मार्च 2024 रोजी राजस्थान मधील पोखरण येथे सुरू होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये स्वदेशी बनावटीची उपकरणे दाखवून संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या स्वरंक्षण धोरतेचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या सरावात लष्कर, नौदल, हवाई दल आणि सायबर आणि अंतराळ घटकांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सरावाचे साक्षीदार होणार आहे.