सौरशक्ती एक वरदान आहे निबंध | Solar Energy Importance Essay In Marathi

प्रस्तावना
आज आपण “सौरशक्ती एक वरदान आहे निबंध Solar Energy Importance Essay In Marathi” या निबंधा विषयी माहिती जाणून घेणार आहोत हा निबंध ५ ते १० वी विद्यार्थ्यांसाठी विशेषकरून लिहिला गेलेला आहे. या निबंधाचा उपयोग तुम्ही तुमच्या सहामाई किंवा वार्षिक परीक्षा साठी सुद्धा करू शकता.

सौरशक्ती एक वरदान आहे निबंध | Solar Energy Importance Essay In Marathi

सौर शक्ती म्हणजे सूर्यकिरणांपासून मिळणाऱ्या उष्णतेपासून निर्माण झालेली ऊर्जा होय. सृष्टीच्या उत्पत्तीपासून सौर शक्ती अस्तित्वात आहे. परंतु जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष अगदी अलीकडचे सौरशक्ती कडे वळले आहे. आज पर्यंत जगात जी शक्ती साधने उपयोगात आणली जात होती तिचे साठे मर्यादित आहे. हे त्यांना उमगले दगडी कोळसा व इतर खनिज संपत्ती हे आहोटीस लागलेले धन आहे. दगडी कोळसा इतर खनिज संपत्ती हे असा अनुशक्ती पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असली तरी आणि बराच काळ पर्यंत पुण्यासारखी असली तरी ती तयार करण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो व त्यातून फार मोठा धोकाही असतो. म्हणूनच कधी न संपणारी व अत्यंत सुरक्षित अशी ऊर्जा शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी फार मोठे संशोधन केले.

प्रयोगांती असे सिद्ध झाले की सौरशक्ती हे जगातील मानवांना लाभलेले अखंड वरदान आहे. सौर शक्तीचा भारताला सर्वाधिक लाभ होत आहे. सूर्य आपल्या सहसंकरानी भारताला तेजाचे ऊर्जेचे दान देत आहे. भारतात वर्षातून जवळपास दहा महिने प्रखर सूर्यप्रकाश असतो त्यामुळे ही सौरशक्ती सातत्याने निर्माण करता येऊ शकेल.

भारतीयांना सौर शक्तीचे महत्त्व पूर्वीच्या काळात देखील कळले होते असे दिसते. घरातील खाद्यपदार्थां वाळवणे, ऊन देऊन धान्य टिकवणे, घरातील वस्तू उन्हात टाकून त्याचे  निर्जंतुकीकरण करणे, पाणी तापवणे अशा अनेक कामासाठी भारतीय गृहिणी फार वर्षापासून सौर शक्तीचा वापर करत आले आहेत. सकाळी तेल लावल्यानंतर स्नान करण्यापूर्वी लहान मुलांना कोवळ्या उन्हात बसवतात त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक असणारे डी जीवनसत्व बालकांना मिळते. सौर शक्तीचा उपयोग समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे, मासे वाढवणे यासाठी होतो. क्रोमोपथीत निरनिराळ्या रंगाच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या बाटल्या उन्हात ठेवतात त्या पाण्याचा उपयोग रोग बरे करण्यासाठी होतो अशी समजूत आहे.

सौर शक्तीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या उद्योगधंद्यासाठी ही होऊ शकतो याचा शोध मात्र अलीकडेच लागला आहे. हल्ली अन्न शिजवण्यासाठी सूर्यचूल तयार केल्या गेल्या आहेत त्यामुळे इंधनाची बचत होते. गणकयंत्र सौरशक्ती वर चालवली जातात. पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये संशोधन करून तेथील शास्त्रज्ञांनी सोलर पॅनल चा उपयोग करून सूर्यकिरणांपासून 2000 सेल्सिअस उष्णता मिळवण्यास यश प्राप्त केले आहे. या उष्णमानात पोलादा सारखे अत्यंत कठीण धातू ही वितळवता येतील. सूर्यकिरणांमुळे तापलेल्या समुद्राच्या पाण्याचा उपयोग करून त्यापासून विद्युत निर्मिती करता येईल का यावर सध्या प्रयोग चालू आहेत. असे सूर्यकिरणांचा प्रत्यक्ष उपयोग करून बॉयलरच्या सहाय्याने विद्युत निर्मिती होऊ शकते उपग्रहावरील यंत्रणा चालविण्यासाठी सौरशक्तीचाच वापर होतो.

सूर्यापासून मिळालेल्या या वरदानामुळे भारतीय समाजाने सूर्याला देवस्थानमध्ये स्थान दिले आहे. सूर्य आहे म्हणूनच आपले अस्तित्व आहे. सूर्योपासना, अर्ध्यदान, सूर्यनमस्कार इत्यादींद्वारे सूर्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. 

सौरशक्ती एक वरदान आहे निबंध | Solar Energy Importance Essay In Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon