ज्येष्ठ नागरिक दिन: Senior Citizen Day 2022 Marathi (History, Significance, Importance) #seniorcitizenday2022
ज्येष्ठ नागरिक दिन: Senior Citizen Day 2022
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Senior Citizen Day 2022” म्हणजेच ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया “वर्ल्ड सीनियर सिटीजन डे” का साजरा केला जातो या विषयी थोडीशी रंजक माहिती.
जागतिक जेष्ठ नागरिक दिन का साजरा केला जातो?
युनायटेड स्टेट मध्ये राष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. हा दिवस मानवी समाजातील वृद्ध लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.
Senior Citizen Day 2022: History
दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस “ज्येष्ठ नागरिक दिन” म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. या दिवसाला ‘World Senior Citizens Day’ म्हणून देखील ओळखले जाते. मानवी समाजातील वृद्धांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. वृद्धांवर परिणाम होणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जसे की त्यांच्या आरोग्याच्या समस्या, तरुण लोक, कुटुंबातील किंवा घराबाहेरून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध समाजामध्ये जनजागृती केली जाते.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे मूळ 19 ऑगस्ट 1988 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ‘Ronald Reagan’ यांनी जाहीर केले होते. 5847 नावाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष यांनी केले यामध्ये अमेरिकेमधील असलेले कुटुंब, समुदाय आणि राष्ट्रातील वृद्ध लोकांच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला होता. युनायटेड स्टेट काँग्रेसने 138 क्रमांकाच्या हाऊस जॉइंट रेझोल्युशन पास केला. ज्यामध्ये Ronald Reagan यांनी दरवर्षी ऑगस्टचा तिसरा रविवार राष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्हणून घोषित करण्याची परवानगी दिली.
World Senior Citizens Day 2022: Significance
युनायटेड नेशन (UN) नमूद केल्याप्रमाणे वृद्ध लोकांची संख्या 2050 पर्यंत 1.5 अब्जपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. ही वाढ पूर्वी आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये ठळकपणे दिसून येईल. कमी विकसित राष्ट्रे 2050 पर्यंत या ग्रहावरील दोन तृतीयांश लोक वृद्ध लोकांचे आयोजन करेल व लोकसंख्येच्या वाढीचा व त्यांच्या सर्वांगीण कल्याण समर्थन देणारी एक मजबूत व्यवस्था अस्तित्वात असणे योग्य आहे.
अनेक वृद्ध लोक त्यांच्या मुलाकडून अत्याचार होत असल्याची तक्रार करतात त्यांना त्यांच्या मुलांकडून त्रास होतो अनेक जण आपल्या वृद्ध आई-वडिलांना ओझे मानतात. काही लोक त्यांना वृद्धाश्रमात टाकतात आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करतात. वृद्धांचे अशा समस्येला तोंड देण्यासाठी दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वृद्धांच्या समस्याकडे विशेष लक्ष दिले जाते.