Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने इतिहास रचला, सर्वात जलद 3000 T20 धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने शनिवारी (८ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३ सामन्यात एक विशेष विक्रम केला. ऋतुराजने 36 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या.
ऋतुराजने 93 डावात 3000 धावांचा टप्पा गाठणाऱ्या केएल राहुलचा विक्रम मोडला. या यादीत सुरेश रैना आणि गौतम गंभीर 107 डावांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.
ऋतुराज गायकवाड यंदाच्या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने 3 सामन्यात 94.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 8 विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 8 गडी गमावून 157 धावा केल्या. ज्यामध्ये ईशान किशनने 32 आणि टीम डेव्हिडने 31 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 18.1 षटकात 3 विकेट गमावत 159 धावा करत विजय मिळवला. चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला अजिंक्य रहाणे, त्याने २७ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. यादरम्यान रहाणेने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.