Bihar RRB NTPC Protest: Khan Sir Patna प्रसिद्ध युट्यूबर खान सर यांच्या विरुद्ध पटना मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.
Bihar RRB NTPC Protest: Khan Sir Patna
रेल्वे भरती परीक्षेच्या RRB NTPC CBT-1 निकालाबाबत तरुणांच्या आंदोलनाचे आता हिंसक निदर्शनात रूपांतर झालेले आहे बिहार मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये रेल्वे भरतीच्या बोर्डाच्या विरोधात विद्यार्थी सातत्याने रूळावर उतरत आहे.
RRB NTPC निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या विरोध अधिकच चिघळत चालला आहे. बिहार मध्ये गेल्या तीन दिवसांपासून ट्रेन थांबवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनच्या बोगी पेटवल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत, इतकेच नाही तर काही ठिकाणी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये दगडफेक झाल्याच्या बातम्याही समोर आलेल्या आहेत.
प्रशासनाच्या सूचना आणि रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन असूनही विद्यार्थी ते मानायला तयार नाहीत. दरम्यान पाटण्यातील खान सर यांच्यासह अनेक संस्थांना विरोधात पटना पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.
पटना येथील पत्रकार नगर पोलिस ठाण्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अशी विधाने केली की पोलिसांनी खान सर सह अनेक संस्थांना विरोधात एफआयआर नोंदवून घेण्याची गरज पडली. आंदोलक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर हिंसाचार आणि दंगलीला खतपाणी घातले सांगितले जाते. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून RRB NTPC परीक्षा रद्द न झाल्यास आंदोलन करताना दिसत आहे. मात्र रेल्वेच्या पत्रकार परिषदेनंतर खान सरांनी एक व्हिडिओ जारी केला की आर RRB ने जो काही निर्णय घेतला आहे, तो 18 तारखेला घेतला असला तर असे झाले नसते. मात्र आता बोर्डाने एक चांगले पाऊल उचलले असून 16 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांकडून सूचना मागवल्या आहेत.