पेट्रोल महाग झाले तर! (Petrol Mahag Zale Tar Vaicharik Nibandh in Marathi)
पेट्रोल महाग झाले तर मराठी निबंध
प्रस्तावना,
पेट्रोल महाग झाले तर! वैचारिक निबंध: समजा जर पेट्रोल महाग झाले तर आपल्या देशावर आणि जगावर याचा काय परिणाम पडेल याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? पेट्रोल महाग झाले तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक देशाची इकॉनोमी म्हणजेच अर्थव्यवस्था तोट्या मध्ये जायला सुरुवात होईल. त्यामुळे देशांमध्ये गरीबी, बेरोजगारी आणि महागाईचे प्रमाण वाढेल. त्यामुळे गुन्हेगारी सारख्या क्षेत्रांना पाठबळ मिळेल. पेट्रोल महाग झाले तर दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी महाग होतील आणि याचा सर्व फटका सामान्य वर्गाला बसेल.
पेट्रोल महाग झाल्याने सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसतो म्हणजेच मध्यमवर्गीय लोकांना याचा फटका बसतो कारण की मध्यमवर्गी व्यक्ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मध्ये आपल्या कराची भरपाई करत असतो त्यामध्येच पेट्रोल महाग झाल्याने समाजातल्या गोष्टीही महाग होतात जसे की दूध खाण्याचे तेल पेट्रोल डिझेल भाजी कपडे उदाहरणार्थ ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या सर्वच गोष्टी महाग होताना आपल्याला दिसतात दूध आणि खाण्याचे पदार्थ या आपल्या दैनंदिन जीवनातील शरीराला गरजेचा असणाऱ्या गोष्टी आहेत त्याचे भाव दिवसेंदिवस वाढल्यामुळे समाजामध्ये आर्थिक टंचाई निर्माण होते ज्यामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढते.
पेट्रोल महाग झाल्यामुळे प्रवास महाग होईल त्यामुळे सर्वसामान्यांना ह्या गोष्टी परवडण्यासारखे नाही. पेट्रोल महाग झाल्यामुळे वस्तूचे भाव वाढले आणि त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशावर दबाव पडेल. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये आर्थिक पोकळी निर्माण होते. पेट्रोल महाग झाल्यामुळे स्थानीय सरकार आपापल्या राज्यांमध्ये वेगवेगळे पेट्रोलचे दर लावते ज्यामुळे सरकारी तिजोरीला कोणत्याही प्रकारचा ताण पडू नये. पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेक समस्या समोर येतात त्यामध्ये एक आहे ‘बेरोजगारी आणि महागाई’ दरवर्षी महागाई 4% वाढते असे एक अहवालाचा निष्कर्ष आहे.
पेट्रोल महाग होण्याची कारणे?
तसे पहायला गेले तर पेट्रोल माग होण्याची कारणे अनेक आहेत त्यामध्ये एक मुख्य कारण आहे ते म्हणजे sanctions हा एक असा प्रकार आहे जो एका देशाने दुसऱ्या देशावर लावलेले प्रतिबंध. सध्याचे उदाहरण म्हणजे रशियाने युक्रेनवर केलेल्या युद्धामुळे अमेरिकेने आपल्या बळाचा वापर करून रशियावर संक्शन लावलेले आहे. ज्यामुळे परिणामी रशिया मधील उत्पादित होणारे नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल यामुळे जगामध्ये एक आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे. कारण की रशिया हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जो क्रुड ऑईल निर्माण करतो आणि युरोपची 5% जीडीपी ही क्रुड ऑईल वर डिपेंड आहे. त्यामुळेच रशियावर संक्शन लावल्यामुळे युरोपमधील बाजार ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. sanctions मुळे पेट्रोलचे दर वाढते याआधी अमेरिकेने इराक आणि वेनेझुईला यासारख्या देशांवर आर्थिक प्रतिबंध लावले होते त्यामुळे जगामध्ये पेट्रोलचे भाव वाढत होते.
पेट्रोल महाग झाल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होते समाजामध्ये एक पोकळी निर्माण होते जी भरून काढणे खूप महत्त्वाचे आहे वस्तू महाग झाल्यामुळे याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. देशाची अर्थव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी स्थानीय सरकार आपापल्या राज्यावर कर स्वरूपात टॅक्स वसूल करते.
पेट्रोल महाग झाल्यामुळे वस्तू महाग होतात हे तर आपल्याला माहिती आहे पण याचा परिणाम एक असाही होतो की लोकं वस्तूची खरेदी कमी करतात याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. समाजामध्ये बॅलन्स टिकवण्यासाठी देवाण-घेवाण खूप महत्त्वाची आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत चालल्यामुळे लोक वस्तू खरेदी करण्यास नकार दर्शवतात. त्यामुळे छोटे व्यापारी नफा कमवू शकत नाही. नफा कमवू शकत नाही तर देशाला यातून उत्पन्न मिळत नाही या सर्वांचा परिणाम फक्त एकच गोष्टीमुळे होतो ती म्हणजे पेट्रोल दरवाढ.