आजच्या आर्टिकल मध्ये आपण Pegasus Spyware Software विषयी माहिती जाणून घेणार आहोत. सॉफ्टवेअर सध्या एवढा चर्चेमध्ये का आहे? आणि हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे काम करते? याबद्दल आपण डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या भारत सरकार वर हा आरोप लावला जात आहे की, त्यांनी spyware software use करून भारतीय लोकांची प्रायव्हसी (privacy) चोरली आहे. चला तर जाणून घेऊया Pegasus Spyware Software विषयी थोडीशी रंजक माहिती.
Key Highlights
- पेगासिस या सॉफ्टवेअरला इजराइल या देशातील सायबर इंटेलिजेंस सिक्युरिटी कंपनीच्या NSO ग्रुपने बनवलेला आहे.
- पेगासिस या सॉफ्टवेअरमुळे फोन मधला डेटा चोरी केला जाऊ शकतो.
- पेगासिस सॉफ्टवेअरमुळे कोणत्याही व्यक्तीवर नजर ठेवली जाऊ शकते.
Pegasus Spyware Information in Marathi
सध्या न्यूज मध्ये एकच टॉपिक कवर केला जात आहे तो म्हणजे Pegasus Spyware Software हा सॉफ्टवेअर इजराइल या देशाची निर्मिती असलेला लोकांवर नजर ठेवणारा किंवा त्यांची प्रायव्हसी चोरणारा software आहे. हा सॉफ्टवेअर बेसिकली इजराइल या देशांनी लोकांची प्रायव्हसी किंवा त्यांची माहिती गोळा करण्यासाठी बनवला होता 2019 पासून भारत सरकार लोकांची प्रायव्हसी चोरण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग करत आहेत असा आरोप सध्या भारत सरकार वर लावला जात आहे.
Pegasus Spyware काय आहे?
Pegasus Spyware एक अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जी लोकांची प्रायव्हसी चोरण्याचे काम करते. हा software इजराइल सरकारने बनवलेला आहे. सर्वांनाच माहिती आहे की इस्रायल हा किती प्रगत आणि आधुनिक देश आहे आणि तसे पाहायला गेले तर भारताचा परम मित्र सुद्धा आहे. त्यामुळे भारत सरकार वर गंभीर आरोप काही राजनेतिक लोकांनी लावले आहेत की ते Pegasus Spyware सॉफ्टवेअरचा यूज करून लोकांची इन्फॉर्मेशन चोरली आहे.
सध्या Pegasus Spyware या सॉफ्टवेअरमुळे लोकांमध्ये चिंता वाढवलेली आहे कारण की हा सॉफ्टवेअर लोकांची प्रायव्हसी चोरण्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे हा सॉफ्टवेअर खूपच सहजतेने तुमची प्रायव्हसी चोरू शकतो. तसेच या सॉफ्टवेअरचा यूज करणाऱ्याला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सुद्धा मिळू शकते ज्यामुळे तो तुम्हाला धोक्यात आणू शकतो. त्यामुळेच न्यूज मध्ये सध्या हाच टॉपिक कवर केला जात आहे हा टॉपिक मुळामध्ये चर्चेमध्ये येण्याचे कारण म्हणजे भारत सरकार वर लोकांची प्रायव्हसी चोरल्याचा आरोप केला जात आहे आणि हा आरोप बीजेपी या पार्टी मधील काही मोठ्या नेत्यांनी केलेला आहे.
Pegasus Spyware कशा प्रकारे काम करते?
Pegasus Spyware सॉफ्टवेअरला इजरायल मधील cyber intelligence and security Firm NSO group ने डेव्हलप केले आहे. या सॉफ्टवेअरला Q Suite आणि Trident या नावाने सुद्धा ओळखले जाते हा आतापर्यंत बाजारांमध्ये असलेला सर्वच बेहतरीन स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. हा सॉफ्टवेअर एप्पल सारख्या मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टिम iOS अँड्रॉइड डिव्हाइस मध्ये खूपच सहजतेने शिरकाव करतो. NSO ग्रुपच्या वेबसाईटच्या अनुसार हि कंपनी अशी टेक्नोलॉजी बनवते त्याच्या मदतीने सरकारी एजन्सीला मदत मिळेल त्यामुळे जगभरामध्ये आतंगवाद आणि अपराधापासून हजारो लोकांना वाचवले जाऊ शकते.
पेगासिस स्पायवेअर एवढा खतरनाक का आहे?
पेगासिस स्पायवेअर एवढा खतरनाक असण्याचे कारण म्हणजे फोन युज करणाऱ्या यूजर पेक्षा याच्याकडे त्या फोनचे जास्त access असते. पेगासिस स्पायवेअर हा सॉफ्टवेअर एका यूजरच्या स्मार्टफोन त्यांच्या अनुमतीशिवाय त्याला हवा तसा प्रकारे करू शकतो. The Guardian यांच्या रिपोर्ट अनुसार Amnesty International Cardio Guarnieri यांनी असा हवाला दिला होता की, दिल्लीमध्ये सिक्युरिटी मध्ये काम करणारे Cardio या मतानुसार हा एक स्पायवेअर ‘Root Level Privileges’ मिळवणारा सॉफ्टवेअर आहे. याचा अर्थ असा की पेगासिस हा तुमच्या फोनमधील गतिविधि मॉनिटर करू शकतो. हा पेगासिस स्पायवेअर सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल मधील message, internet browsing, photos and Store file सुद्धा access करू शकतो.
Zero Click Attack काय आहे?
इजराइल या देशांनी बनवलेला पेगासिस स्पायवेअर सॉफ्टवेअर “Zero Click Attack” करणारा सॉफ्टवेअर आहे याचा अर्थ असा की हा सॉफ्टवेअर आपण काहीही न करता आपल्या नकळत आपला डेटा चोरी करू शकतो. जसे की आपण कुठल्याही वेब साईटला विजीट करतो किंवा प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करतो तेव्हा नकळत आपल्या फोनमध्ये वायरस शिरकाव करतो पण हा एक सॉफ्टवेअर असा आहे की कुठल्याही ॲप्स किंवा वेबसाईट विजिट केल्या शिवाय आपल्या फोन मधून डेटा चोरी करू शकतो. हा सॉफ्टवेअर आपले आप मोबाईल फोन मध्ये इंस्टॉल होतो.
पेगासिस स्पायवेअर सॉफ्टवेअर मोबाईल मध्ये कशा प्रकारे येतो?
हा स्पायवेअर खूपच आधुनिक पद्धतीने बनवला गेल्या असल्यामुळे हा सॉफ्टवेअर खुपच मुक्तपणे तुमच्या फोनमध्ये शिरकाव करतो जसे की तुम्हाला एखाद्या unknown number वरून misscall येतो आणि हा मिस कॉल तुमच्या फोनमध्ये शिरकाव करतो आणि तुमचा डेटा चोरी करण्यास सुरुवात करतो. हा सॉफ्टवेअर एवढा खतरनाक असल्याचे कारण म्हणजे ज्या नंबर वरून मिस कॉल आलेला आहे हा नंबर सुद्धा हा सॉफ्टवेअर तुमच्या call history मध्ये दाखवत नाही त्यामुळे तुम्हाला कळणार सुद्धा नाही की, तुमची प्रायव्हसी चोरी होत आहे. त्यामुळे आतापर्यंत जेवढे स्पायवेअर सॉफ्टवेअर बनवले गेले आहेत त्यामध्ये Pegasus Spyware सर्वात खतरनाक मांडल्याचे जात आहे.
Pegasus India and Pakistan
पेगासिस स्पायवेअर पाकिस्तान आणि भारत टेक्नॉलॉजी युद्ध:-
पेगासिस स्पायवेअर सॉफ्टवेअरचा उपयोग केल्यामुळे भारताच्या अडचणी संख्या वाढताना दिसत आहे काही दिवसापूर्वी भारताने हा सॉफ्टवेअर पाकिस्तानी प्रधानमंत्री इम्रान खानने यांच्या मोबाईल वरून डेटा चोरी केल्याचा पाकिस्तान सरकार करत आहे. आणि ही डेटा चोरी जवळजवळ दोन वर्षापासून चालू होते त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे रहात आहे. एका रिपोर्टच्या अनुसार हा सॉफ्टवेअर भारतातल्या तसेच जगामधील चाळीस देशांमध्ये मोठ्या नामांकित व्यक्ती चोरी करण्यासाठी वापरला जात आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री सुद्धा आहेत इजराइल ची कंपनी NSO Group ने पेगासिस निर्मिती आणि डेटा चोरी कशा प्रकारे केली जाते याबद्दल माहिती दिली होती. सध्या भारतावर पाकिस्तान सरकार हा आरोप लावत आहे की त्यांनी पाकिस्तान प्रधानमंत्री इम्रान खान यांची प्रायव्हसी चोरलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचे रिलेशन खूपच खराब होताना दिसणार आहे.
FAQ
Q: पेगासिस सॉफ्टवेअर कोणी बनवला आहे?
Ans: पेगासिस सॉफ्टवेअर इजराइल च्या सायबर इंटेलिजन्स नएसओ या ग्रुप ने बनवलेला आहे.
Q: पेगासिस सॉफ्टवेअरला काय म्हणतात?
Q: Pegasus Spyware Software
Q: पेगासिस स्पायवेअर सॉफ्टवेअर फोन मध्ये कशाप्रकारे येतो?
Ans: फोन मध्ये मिस कॉलच्या माध्यमातून हा सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल मध्ये शिरकाव करतो.
Final Word:-
Pegasus Spyware Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “Pegasus Spyware Information in Marathi”