पाऊस पडला नाही तर! मराठी निबंध (Paus Nahi Padla Tar Essay in Marathi)
जर पाऊस पडला नसता तर आपण सगळे इथे नसतो कारण की आपले संपूर्ण जीवन पावसावर अवलंबून आहे. पाऊस पडला नसता तर आपल्याला प्यायला पाणी मिळाले नसते, झाडे उगवली नसते. मनुष्य आणि प्राण्यांसाठी काहीही खायला नसते आपल्या आजूबाजूला हिरवळ नसते पाऊस नसता तर खऱ्या अर्थाने मनुष्यही नसतो कारण की आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी पावसाचे पाणी आणि खाण्यासाठी अन्न लागते जे झाडांपासून मिळते. जे प्राणी पक्षी आहेत ज्यांना आपण आवडीने पाहतो ते सुद्धा या जगात नसते निसर्ग निर्मनुष्य झाला असता.
पाऊस पडला नाही तर! मराठी निबंध (Paus Nahi Padla Tar Essay in Marathi)
नमस्कार मित्रांनो, पाऊस पडला नाही तर काय विचित्र कल्पना आहे. आज तुमच्यासाठी पाऊस पडला नाही तर या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आहेत.
मुसळधार पाऊस पडत होता, मी सकाळी शाळेत जायला तयार होतो. रोजच्या प्रमाणे आम्ही आमच्या घरी टीव्हीवर बातम्या पाहत होतो. तेव्हाच समजले की, अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणी तुंबले असून त्यामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टीचे नाव ऐकताच मी आनंदाने नाचू लागलो, अतिवृष्टीमुळे काय झाले ते टीव्हीवर दाखवले गेले. पावसामुळे झालेला विध्वंस पाहून मी थक्क झालो. पाऊस पडला नाही तर ही कल्पना माझ्या मनात आली तेव्हाच.
पाऊस पडला नाही तर लोकांना पावसाचा त्रास होणार नाही आणि जास्त पाणी तुंबल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही आणि लोक आनंदाने जगतील. आणि मी या विषयावर अधिक विचार करू लागलो.
पाऊस पडला नाही तर प्यायला पाणी कसे मिळेल आणि पाऊस पडला नाही तर नद्या, तलाव कसे भरतील. जर नद्या, तलाव टिकले नाहीत तर त्यात राहणारे सजीव पाण्याशिवाय कसे जगणार, ते सगळे मारले जातील.
आपल्या आजूबाजूला जी हिरवीगार झाडे दिसतात, जी आपल्याला हवा, फळे खाण्यास व सावली देतात, ती सर्व झाडे पाऊस न पडल्यास सुकून मरतील. हा सुंदर निसर्ग जो आपण पाहतो तो केवळ दगडांच्या देशासारखा वाळवंट होईल.
पाऊस पडला नाही तर पावसातून येणारा मातीचा सुगंध आपल्याला घेता येणार नाही. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद आपण घेऊ शकणार नाही, इंद्रधनुष्य पाहू शकणार नाही.
पाऊस पडला नाही तर खायला काही मिळणार नाही कारण पावसाशिवाय शेती शक्य नाही. पाऊस नसेल तर या पृथ्वीवर जीवन शक्य नाही कारण पावसाशिवाय आपल्याला प्यायला पाणीही मिळणार नाही.
पावसामुळे नुकसान होते हे खरे, पण त्यातही आपली चूक आहे. आम्ही सर्वत्र सिमेंटची जंगले केली आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जात नाही आणि नीट वाहत नाही. त्यामुळे आम्हाला पावसाचा त्रास होतो. पाऊस पडला तरच जनजीवन शक्य आहे.