पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध १०० ओळी | Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi

प्रस्तावना
पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध १०० ओळी Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi: ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हि आजच्या काळात खूप महत्वाची गरज आहे. सध्याच्या काळात पिण्याचे पाणी खूपच कमी कमी होत चाले आहे, याचे कारण म्हणजे आधुनिक काळात होत असलेली झाडांची कत्ल आणि वाढते ग्लोबल वार्मिंग या सर्व गोष्टींचा आपल्या पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना राबवणे खूप म्हत्वाचे आहे.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध १०० ओळी | Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi

हवा पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याची टंचाईची समस्या सोडवायला अग्र क्रमांक द्यावा लागतो. खेड्यापाड्यातून ही समस्या फारच बिकट आहे. शहरातील ठराविक वेळी पाणी येत असेल तर सर्वच व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते पण खेड्यापाड्यातील लोकांना घडाभर पाण्यासाठी मिळेलं मैल चालावे लागते किंवा गावात येणाऱ्या ट्रॅक्टर मधून कष्टपूर्वक पाणी मिळावे लागते अर्थच अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते.

स्वच्छतेसाठी पाणीच नसल्यामुळे व स्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याचे नवल काय माणसांच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते तर शेतीला आणि वनस्पतीच्या वाडीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल याची कल्पना केली तरी बरीच केलेलीच बरी वास्तविक भारतात हा नद्यांचा देश आहे वास्तविक भारत हा खेड्यांचा देश आहे भारताच्या काही भागात पावसाचे पाणीही भरपूर मिळते कोकणात व इतर अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो.

पावसाळ्यात भारतातील काही नद्यांना पूर येतात जसे की ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना गोदावरी इत्यादी नद्यांच्या येणाऱ्या पुरामुळे आजूबाजूच्या प्रदर्शनाची वाताहत झाल्याची बातमी वृत्तपत्रात वारंवार येतात. याचा अर्थ असा की उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी 80 टक्के पाणी वाहून जाते हे भारताचे दुर्दैव आहे.

धरण बांधून पाणी अडवणे हा त्यावर एक उपाय आहे तसेच देशभराच्या नद्या एकमेकांना जोडून नद्यांचे जाळे निर्माण करण्याची एक कल्पना सध्या मोठ्या चर्चेत आहे. हा फार मोठा फायदा देणारा उपाय आहे. पण पाणी पण ही योजना अत्यंत खर्चिक आणि खुपच वर्षाव लावणारी आहे काही धोरणांमुळे काही धरणांमुळे काही लोकांची सोय झाली असली तरी अजून असे कितीही तरी जिल्हे आहेत की जिथे उन्हाळ्यात लोकांवर लोकांना थेंबभर पाणी मिळणे मुश्कील आहे.

भाकरा नांगल, दामोदर व्हॅली, कोयना, नाथ सागर, नागार्जुन सागर अशी धरणे भारतात ठिकाणी बांधली गेली ही गोष्ट चांगली आहे. पण धरणांमुळे इतरही काही समस्या निर्माण झालेल्या धरणामुळे खेड्यापाड्यातील वीज पोहोचली हे चांगले झाले व त्यामुळे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वापरले जाऊ लागले. त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या नद्यांचे पाणी धरणात गेल्यामुळे नद्यांना कोरड पडली विजेमुळे कारखाने सुरू झाले. ही गोष्ट चांगली घडली पण कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे जल प्रदूषण होऊ लागले गंगा-यमुना या सारख्या मोठ्या नद्यांच्या बाबतीत ही हा प्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे.

पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पिण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या वा कितीही पाण्याचे पंप बसवले तरी ते सर्वच निरुपयोगी ठरणार आहे. कारण की जमिनीखालील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे त्यासाठी दोन्ही योजना तातडीने घेतल्या पाहिजेत एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करणे झाडे आपल्या मुळांद्वारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेल तसेच “पाणी अडवा पाणी जिरवा” ही दुहेरी योजनासुद्धा युद्धपातळीवर राबवायला हवी यामुळेही जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल मग झरे, विहिरी, नद्या यांचे पाणी आटणार नाही. पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खर्‍या अर्थाने बहरू लागेल.

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध १०० ओळी | Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi

Tags:  #पाणीअडवापाणीजिरवा #paniadvapanijirva #marathinibandh

1 thought on “पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध १०० ओळी | Pani Adva Pani Jirva Nibandh Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group