Mahila Mukti Din: 2023 (Mahila Mukti Din Bhashan, savitribai phule jayanti 2023, savitribai phule speech in marathi) #mahilamuktidin2023
Mahila Mukti Din: 2023
Mahila Mukti Din: आजच्या आर्टिकल मध्ये आपण महिला मुक्ती दिन का साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दरवर्षी तीन जानेवारी हा दिवस महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून साजरा केला जातो चला तर जाणून घेऊया सावित्रीबाई फुले यांच्या विषयी थोडीशी माहिती.
Mahila Mukti Din: Information in Marathi
महिला मुक्ती दिन मराठी माहिती
दरवर्षी 3 जानेवारी रोजी आपण महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा केला जातो. यावर्षी आपण सावित्रीबाई फुले यांची 192 जयंती साजरी करणार आहोत.
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला होत्या ज्या शिक्षित होत्या त्यांना शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिले होते. ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंशी विवाह केला होता वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता.
सावित्रीबाई मुळे आज भारतामध्ये अनेक महिला या आघाडीवर आहेत.
Savitribai Phule Speech in Marathi: 2023
ज्योतिरापांचे मूळ आडनाव शिरसागर होते पण पेशव्यांनी ज्योतिरावांचे वडील गोविंदराव फुले यांना पुण्यातल्या फुल बागेची जमीन बक्षीस म्हणून दिली त्यांचे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक झाले फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे आडनाव फुले असे झाले.
ज्योतिराव हे स्वतः शिक्षित होते आणि त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवले 1 मे 1847 रोजी म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी शंभर वर्षपूर्वी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील मागास आणि गोरगरिबांसाठी एक शाळा काढली त्यांची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यामध्ये मुलींची शाळा काढली. भारतातील ही पहिली मुलींची शाळा होती या शाळेमध्ये सावित्रीबाई मुख्याध्यापिका होत्या.
सावित्रीबाईंच्या या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या. वर्षभरात ही संख्या जेमतेम ४५ पर्यंत पोहोचली. शाळा काढून मुलींना शिकवायला सुरुवात केली म्हणून सनातन्यांनी आणि उच्चवर्णीयांनी ‘धर्म बुडाला.. जग बुडणार’ अशी सावित्रीबाईंवर टीका सुरू केली. सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले. काही उन्मत्त त्यांच्या अंगावर धावून गेले.
बहिष्कारही घालण्यात आला. सावित्रीबाई डगमगडल्या नाहीत. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले. आता त्या अधिक उत्साहाने कामाला लागल्या. केवळ मुलींना शिक्षण देऊन भागणार नाही. अपप्रवृत्तीविरुद्ध लढले पाहिजे.
बाल-जरठ विवाह प्रथेमध्ये अनेक मुली वयाच्या १२व्या, १३ वर्षी विधवा होऊ लागल्या. अशा मुलींना नव-याच्या चितेवर उडी टाकून सती जावे लागे. किंवा त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप केले जाई. या सर्व दुष्ट प्रथेला सावित्रीबाईंनी विरोध केला आणि ज्योतिरावांनी बाल हत्या प्रतिबंधकगृह सुरू केले.
सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. एवढेच नव्हे तर बलात्काराने गरोदर राहिलेल्या महिलांचे बाळंतपण सावित्रीबाई करत होत्या. याच ठिकाणी काशीबाई या ब्राम्हण विधवेचे मूल सावित्रीबाईंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले. अशा या महान सावित्रीबाईंची ‘काव्य फुले’ आणि ‘सावित्रीबाईंची भाषणे’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली. प्लेगच्या रोग्याची सेवा करताना सावित्रीबाईंनाच प्लेग झाला आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांचे निधन झाले.