कार्तिक पौर्णिमा मराठीत माहिती – Kartik Purnima Information in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘कार्तिक पौर्णिमा’ बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी कार्तिक पौर्णिमा वर्षाच्या आठव्या महिन्यात साजरी केली जाते. हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातोतसेच भारताबाहेर राहणाऱ्या देशांमध्ये सुद्धा हा सण मोठ्या उत्सवांमध्ये साजरा केला जातो चला तर जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमा बद्दल थोडीशी रंजक माहिती.
कार्तिक पौर्णिमा मराठीत माहिती – Kartik Purnima Information in Marathi
कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण केवळ हिंदू साठीच नाही तर शिखांसाठी ही खूप महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी शिखांचे ‘पहिले गुरू नानक’ यांचा जन्म झाला होता. शीख धर्माचे अनुयायी काही महिने आधीच गुरूच्या प्रकाश परवाची तयारी सुरु करतात.
Guru Purnima 2021: गुरुनानक जयंती या पवित्र सणानिमित्त देशातील विविध गुरुद्वारामध्ये दिवसभर प्रभातफेरी आणि शब्द कीर्तनाचे आयोजन केले जाते. देशातील विविध गुरुद्वारामध्ये दिल्लीच्या नानक गुरुद्वाराला खूप महत्त्व आहे कारण सुमारे पाच दशकांपूर्वी गुरुनानकजी या ठिकाणी येऊन राहिले होते. या प्रसिद्ध गुरुद्वाराच्या धार्मिक इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊ.
देशाची राजधानी दिल्लीतील पहिला गुरुद्वारा
देशातील प्रत्येक गुरुद्वारा स्वतःमध्ये खास आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला त्या गुरुद्वारा बद्दल सांगणार आहोत याची स्थापना स्वतः गुरुनानक साहेबांनी केली होती. असे मानले जाते की जेव्हा शिखांचे पहिले गुरू नानक 1505 मध्ये पहिल्यांदा दिल्लीत आले तेव्हा त्यांनी या गुरुद्वाराची स्थापना केली. त्यामुळे त्या प्रसिद्ध गुरुद्वाराला शीख समुदायासाठी खूप महत्त्व आहे असे मानले जाते की ‘नानक प्याऊ गुरुद्वारा’ (Gurudwara Nanak Piao Sahib Delhi) हा देशाच्या राजधानीतील पहिला दिल्ली चा गुरुद्वारा आहे.
Gurudwara Nanak Piao Sahib History in Marathi
जर तुम्ही विचारत केला असाल की गुरुनानक जयंती संबंधित गुरुद्वाराला ‘नानक प्याऊ गुरुद्वारा’ असे का म्हटले जाते? चला तर जाणून घेऊया त्यामागचे एक चमत्कारीक घटना.
वास्तविक जेव्हा गुरुनानक जी पहिल्यांदा दिल्लीत आले, तेव्हा ते याच ठिकाणी राहिले. त्याकाळी येथे राहणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी नशिबी आले नाही कारण येथील जमिनीतून खारे पाणी बाहेर येत असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे येथील लोक खूप अस्वस्थ आणि अनेकदा आजारी असायचे. जेव्हा गुरुनानकजी येथे पोचले तेव्हा लोकांनी त्यांना ही समस्या सांगितली यानंतर गुरुनानकजी त्यांच्या दिव्य दृष्टीने लोकांना एक ठिकाणी विहीर खोदण्यास सांगितली त्यानंतर गुरूंच्या चमत्काराने तेथे गोड पाणी आले आणि लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत या गुरुद्वारामध्ये लोकांना फक्त अमृत पाणी प्यायला मिळत नाही उलट जवळजवळ पाचशे वर्षापासून अखंड चालू असलेला हा लंगर लोकांची भूक भागवण्याचे काम करत आहे हा गुरुद्वारा फुलांनी आणि दिव्यांनी सजवलेला आहे.
Kartik Purnima 2021 – कार्तिक पौर्णिमा 2021 महत्त्व आणि मुहूर्त
कार्तिक पौर्णिमा 2021 यावेळी कार्तिक पौर्णिमा 19 नोव्हेंबर शुक्रवारी रोजी आहे वास्तविक कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणार्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात कार्तिक पौर्णिमेचा सण पाच दिवस चालतो हा सण प्रबोधनी एकादशीच्या दिवशी सुरू होतो आणि पौर्णिमेच्या दिवशी संपतो.
कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्म ग्रंथांमध्ये खूप महत्त्व दिले जाते. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात.
कार्तिक पौर्णिमा कधी आहे?
कार्तिक पौर्णिमा कधी आहे: यावेळी कार्तिक पौर्णिमा 2019 रोजी 19 नोव्हेंबर (शुक्रवारी) आहे.
कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त: 18 नोव्हेंबर (गुरुवार) पौर्णिमा रात्री 11:55 वाजेपासून 19 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी 02:25 पर्यंत असणार आहे.
- Kartik Purnima 2021 Start Date: 18 नोव्हेंबर (गुरुवार) पौर्णिमा रात्री 11:55
- Kartik Purnima 2021 End Date and Time: 19 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी 02:25
कार्तिक पौर्णिमेचे महत्व – Significance of Kartik Purnima in Marathi
कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा आणि गंगास्नान असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडर नुसार वर्षाचा आठवा महिना कार्तिक महिना आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात.
दरवर्षी पंधरा पौर्णिमा असतात. जेव्हा अधिक मास किवा मलमास येतात तेव्हा त्यांची संख्या 16 पर्यंत वाढते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे मोठे महत्त्व शास्त्र सांगण्यात आले आहे.
सृष्टीच्या निर्मितीपासून ही तारीख खूप खास आहे. पुराणांमध्ये हा दिवस उपवास, तपस्या यासंदर्भात मोक्ष प्रदान करणार आहे. त्याचे महत्त्व केवळ वैष्णव भक्तांसाठी नाही तर शिवभक्तांसाठी आणि शीख धर्मासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.
विष्णुच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे. कारण याच दिवशी भगवान विष्णूचा पहिला अवतार झाला होता पहिल्या अवतारात भगवान विष्णु यांनी मस्य म्हणजे माशाचे रूप घेतले होते. प्रलय संपेपर्यंत वेदाचे रक्षण करण्यासाठी सप्तऋषीचे, धान्याचे आणि राजा सत्यवताचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराला हा अवतार घ्यावा लागला त्यामुळेच विश्वाची निर्मिती पुन्हा सोपी झाली.
शिवभक्तांच्या मते या दिवशी भगवान भोलेनाथ त्रिपुरासूर नावाच्या महान राक्षसाचा वध केला यावरून त्याची त्रिपुरी म्हणून पूजा केली जाते. यावर देवता खूप प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूने शंकराचे नाव त्रिपुरी ठेवले जे शिवाच्या अनेक नावांपैकी एक आहे. म्हणून याला ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असे म्हणतात.
शीख धर्मात कार्तिक पौर्णिमेचा दिवस प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी शीख समाजाचे संस्थापक गुरुनानक देव यांचा जन्म झाला होता. या दिवशी शीख पंथाचे अनुयायी सकाळी स्नान करतात गुरुद्वारामध्ये जातात, गुरुवाणी ऐकतात आणि नानकजींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात. त्याला गुरू पर्व असेही म्हटले जाते.
कार्तिक पौर्णिमेला दिवाळीप्रमाणे (kartik purnima festival) संध्याकाळी दिवा लावून साजरा केला जातो.
हा दिवस एक करण्यासाठी नाही तर अनेक कारणासाठी खास आहे. या दिवशी गंगा स्नान, दीपदान इतर दन विशेष महत्वाचा आहे. या दिवशी शिरसागर दानाचे अनन्य साधारण महत्व आहे.
या दिवशी आकाशात चंद्र उगवत असताना शिव, समृद्धी, संतती, प्रीती, अनुसूया आणि क्षमा यासह कृतीकांची पूजा केल्याने शिवाला प्रसन्नता प्राप्त होते. या दिवशी कृतिका मधील शिव शंकराचे दर्शन घेतल्याने माणूस सात जन्मासाठी ज्ञानी आणि धनवान होतो असेही मानले जाते. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे.
Final Word:-
कार्तिक पौर्णिमा मराठीत माहिती – Kartik Purnima Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.