Kargil Vijay Diwas Speech in Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण “कारगिल विजय दिवस मराठी भाषण” कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी शाळा महाविद्यालय आणि कॉलेजमध्ये वकृत्व स्पर्धा आयोजित केली जाते आणि या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र आयोजित केली जातात. तसेच 26 जुलै रोजी देखील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी ‘26 जुलै हा कारगिल विजय दिवस‘ म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिवस निमित्त भाषण करण्याची संधी दिली जाते.
आज आपण कारगिल विजय दिवस मराठी भाषण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेत आहोत.
कारगिल विजय दिवस मराठी भाषण | Kargil Vijay Diwas Speech in Marathi
कारगिल विजय दिवस मराठी भाषणाची सुरुवात कशी करावी
आदरणीय
महोदय, गुरुजन आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
आज आपण येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
कारगिल विजय दिवस दरवर्षी भारतामध्ये 26 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस कारगिल युद्ध मध्ये भारतीय सैनिकांचा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 मे ते 26 जुलै 1999 लढले गेले आणि भारताचा यामध्ये विजय झाला. या सुवर्ण दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी भारतामध्ये 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस या नावाने साजरा केला जातो.
हे युद्ध कारगिल जिल्ह्यातील कारगिल टेकड्यांवर झाले होते म्हणूनच याला ‘कारगिल युद्ध‘ असे म्हणतात. कारगिल युद्धामध्ये भारतीय लष्कराचे 527 जवान शहीद झाले होते. कारगिल विजय दिवस हा भारतातील लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करण्याचा दिवस आहे.
कारगिल विजय दिवसानिमित्त भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्सव आयोजित केले जातात. या समारंभामध्ये भारतीय लष्कराच्या जवानांचा सन्मान केला जातो आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.
कारगिल विजय दिवस (10 ब्रीद वाक्य)
यावर्षी आपण कारगिल विजय दिवसाचा 24 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत.
कारगिल विजय दिवस विषयी भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय भारत!
2 thoughts on “कारगिल विजय दिवस मराठी भाषण | Kargil Vijay Diwas Speech in Marathi”