कांतारा म्हणजे काय? – Kantara Meaning in Marathi (Movie, Story, Director Name, Cast, Collection, OTT Release Date) #Kantara
Kantara Meaning in Marathi
Kantara Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “कांतारा” या शब्दाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सध्या कांतारा हा शब्द खूपच चर्चेचा विषय आहे. दक्षिण भारतामध्ये बनलेला कन्नड भाषेतील हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आकर्षित करत आहे. चला तर जाणून घेऊया कांतारा शब्दाचा अर्थ काय होतो याविषयी थोडीशी माहिती.
Kantara Meaning in Marathi: रहस्यमय जंगल
कांतारा या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले आहे या चित्रपटाने KGF चा विक्रम मोडला असून बॉक्स ऑफिसवर 100 कोटीचा टप्पा ही पार केलेला आहे. कांतारा हा चित्रपट कन्नड भाषेमध्ये बनला असल्याने हिंदी भाषिकांना त्याचे कन्नड नाव फारसे परिचित नाहीत त्यामुळेच लोक कांतारा या चित्रपटाचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी गुगलची मदत घेत आहे.
कांतारा म्हणजे काय?
सर्वप्रथम जाणून घेऊया कांतारा या शब्दाचा अर्थ:
कांतारा या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल, मिस्टिकल फॉरेस्ट (Mystical Forest) असा होतो. या चित्रपटाची कथा एका जंगलात भोवती फिरत असल्याने अनेक रहस्य आणि पुराणकथांनी वेढलेला हा चित्रपट आहे आणि याच धरतीवर या चित्रपटाचे नाव कांतारा असे ठेवण्यात आलेले आहे.
या चित्रपटाविषयी बोलायचं झाले तर ‘ऋषभ शेट्टी’ यांची यात मुख्य भूमिका आहे जो कामाला चॅम्पियनची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्रीची भूमिका ‘सप्तमी गोंडा’ आणि ‘मानसी सुधीर’ यांनी साकारली आहे. या चित्रपटात प्रामुख्याने दक्षिण भारतातील प्रादेशिक संस्कृती आणि तिथल्या जंगलांशी संबंधित मिथिकवर आधारित आहे आणि त्यातील गोष्टी दाखवण्याची पद्धत खूपच वेगळी असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत आणि याच कारणास्तव शंभर कोटीहून अधिक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केले आहे हा चित्रपट केवळ 16 करोड मध्ये बनलेला चित्रपट आहे.
Kantara: Movie Cast
- ऋषभ शेट्टी
- सप्तमी गोंडा
- मानसी सुधीर
Kantara: Director Name
ऋषभ शेट्टी
Kantara: Box Office Collection
100 Cr.
Kantara: OTT Release Date
30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला कांतारा हा चित्रपट आता OTT platform प्रेक्षकांना पाहता येणार आहे. Amazon Prime Video सबस्क्रीप्शन असलेल्या ग्राहकांना हा चित्रपट आता Prime Video वर पाहता येणार आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी Prime Video ने कांतारा चित्रपटाचे राइट्स विकत घेतलेले आहे.
1 thought on “Kantara Meaning in Marathi”