किस डे: Happy Kiss Day 2022 Information in Marathi (History, Significance, Quotes, Status, Messages, And Greetings)
किस डे: Happy Kiss Day 2022 Information in Marathi
१३ फेब्रुवारी २०२२
दरवर्षी जगभरातील लोक 13 फेब्रुवारी हा दिवस ‘किस डे’ म्हणून साजरा करतात ‘किस डे’ हा व्हॅलेंटाईन दिवसातील 7 वा महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये खूप मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर प्रेयसीचे चुंबन घेतो आणि हा दिवस साजरा करतो. हा दिवस प्रेमाचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखला जातो. चला तर जाणून घेऊया ‘किस डे’ विषयी थोडीशी रंजक माहिती.
Valentine week 2022 in Marathi
किस म्हणजे काय?
किस म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या ओठावर अलगद केलेला स्पर्श म्हणजे किस होय. ज्याला आपण मराठीमध्ये चुंबन म्हणतो. चुंबन ही संस्कृती पाश्चिमात्य लोकांची असले तरी याचे संदर्भ भारतीय संस्कृतीशी सुद्धा जोडले जातात. चुंबन हे प्रेम, उत्कटता, आपुलकी, कृतज्ञता, अभिवादन, मैत्री, शांतता अशा अनेक भावना व्यक्त करू शकते. काही धर्मामध्ये चुंबन हे एक विधी आहे औपचारिक रित्या हा एक प्रतीकात्मक अनुभव आहे जो वचनबद्धता दर्शवतो.
किस डे चा इतिहास – Kiss Day History in Marathi
तसे पाहायला गेले तर ‘किस डे चा इतिहास’ आपल्याला आदिम काळापासून पाहायला मिळतो. म्हणजेच गुहे मध्ये राहणाऱ्या माणसाशी याचा संबंध जोडलेला आहे. पूर्वीच्या काळी म्हणजेच आदिम काळामध्ये आई आपल्या मुलाला अन्न चघळून चरत असे अशा प्रकारे पहिले किस हा प्रकार उदयास आला यामध्ये या चुंबन मध्ये एक भावनिक प्रेम होते.
तसेच किस ला एक पवित्र धार्मिक मान्यता आहे. इ.स.पूर्व 2000 पासून जगभरातील असे अनेक उदाहरणे आहेत जे किस (चुंबन) हे पवित्र मानतात. अगदी भारतीय संस्कृतीतही असे मानले जाते की एकमेकांचा सोडलेला श्वास आत्म्याचे एकत्रीकरण करते. आपल्या वैदिक संस्कृत ग्रंथांमध्येही आपल्या ‘ओठांतून ओलावा पिणे’ तिसऱ्या शतकात वात्सायन कामसूत्रात एका संपूर्ण प्रकाराचा समावेश आहे ज्यात प्रियकराचे चुंबन घेण्याची पद्धतीचे वर्णन केलेले आहे.
फ्रान्समध्ये सहाव्या शतकामध्ये नृत्य आणि स्नेहाचा देखावा झाल्यानंतर चुंबन घेण्याची पद्धत होती. काही समारंभामध्ये लग्न समारंभामध्ये चुंबन घेऊन जोडीदार एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देतात, ही संस्कृती रशिया मधून आलेली आहे. रोमन लोकांनी अभिवादन करण्यासाठी चुंबन उपयोग करत असे रोमन लोकांनी संपूर्ण जगावर साम्राज्य प्रस्थापित केले होते म्हणूनच चुंबन ही संकल्पना जगभरामध्ये पसरली असे काही इतिहासकारांचे मत आहे.
किस डे चे महत्व – Kiss Day Significance in Marathi
नात्यामधील गोडवा निर्माण करण्याचं आणि एकमेकांना समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे. चुंबन मध्ये खूपच मोठी शक्ती असते जी आपल्याला आपल्या जोडीदाराशी कनेक्ट करते, तसेच चुंबन मध्ये खूप भावना असतात. चुंबन हे कदाचित सर्व शारीरिक हावभावांपैकी सर्वात जवळचे असतात, जे एकमेकांच्या अगदी जवळ असलेल्या लोकांमध्ये सामायिक केले जातात.
किस डे साजरा करण्याचे कारण
जे शब्द सांगता येत नाही ते व्यक्त करण्यासाठी ‘किस डे’ एक चांगला मार्ग आहे. सौम्य चुंबन ही प्रेमाची जिव्हाळची अभिव्यक्ती आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारांचे पहिल्यांदा चुंबन घेता हे संपूर्ण वेगळी भावना असते तुम्ही आनंदाच्या अनेक निरागसतेचा स्वप्नाळू क्षेत्रात प्रवेश करत असतं जिथे सर्व काही अगदी परिपूर्ण दिसते.
व्हॅलेंटाईन डे च्या आठवड्यातील हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे हग डे या दिवसानंतर किस डे या दिवसाची सुरुवात होते या दिवशी प्रियकर आपल्या प्रेयसीला चे चुंबन घेऊन हा दिवस साजरा करतो. हा दिवस व्हॅलेंटाईन डे नंतर सर्वात महत्त्वाचा दिवस आहे.
Kiss Day Quotes in Marathi
सकाळी तुझे चुंबन घेतल्याने माझा दिवस आनंदी आणि उज्ज्वल होतो.
किस डे च्या शुभेच्छा!
तुझ्या ओठांचे चुंबन घेणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे.
किस डे च्या शुभेच्छा!
फक्त एक चुंबन माझा दिवस बनवतो, दररोज सकाळी गालावर एक चुंबन दिवस उजळतो.
किस डे च्या शुभेच्छा!
माझे डोळे तुला पाहण्यासाठी आतुर आहेत, माझे कान तुला ऐकण्यासाठी आतुर आहेत. आणि माझे ओठ तुझे चुंबन घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
किस डे च्या शुभेच्छा!
तुझ्या ओठांच्या स्पर्शाशिवाय एक दिवस मला खरोखरच आजारी बनवतो. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.
किस डे च्या शुभेच्छा!
चुंबन हे एक रहस्य आहे जे ओठांना कानापर्यंत घेऊन जाते.
किस डे च्या शुभेच्छा!
चुंबन ही एक सुंदर युक्ती आहे जी निसर्गाने शब्दांची गरज नसताना बनलेली आहे.
किस डे च्या शुभेच्छा!
3 thoughts on “किस डे: Happy Kiss Day 2022 Information in Marathi (History, Significance, Quotes, Status, Messages, And Greetings)”