गुगल डूडल ने 19 मार्च 2024 रोजी आपल्या ऑफिशियल वेबसाईटच्या लोगोवर नौरोज़ सणाचा डूडल बनवलेला आहे. चला तर जाणून घेऊया नौरोज़ आहे तरी काय याबद्दल थोडीशी माहिती.
नौरोज सणाचा इतिहास नौरोज़ ज्याला पर्शियन नववर्ष म्हणूनही ओळखले जाते. हा सण इराण आणि मध्ये अशीया आणि मध्यपूर्वेतील इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा सर्वात जुना आणि पारंपारिक सण आहे. नौरोज़ साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. तसेच ही संस्कृती देखील जुनी आहे. नौरोज़ सहसा 21 मार्च रोजी साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागचे कारण म्हणजे उत्तर गोलार्धात वसंत ऋतूचा पहिला दिवस साजरा करणे आहे. नौरोज़ साजरा साजरा करण्याचे कारण म्हणजे नवीन हंगामाचे स्वागत करणे आहे.