Google: Bug Bounty Program (Information, Price, India) #GoogleNews
Google: Bug Bounty Program
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Google ने लॉंच केले “Bug Bounty Program” बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Google ने नुसतेच आपले नवीन Bug bounty program लॉन्च केलेला आहे यामध्ये कंपनीला ओपन सोर्स प्रोजेक्ट मध्ये असुरक्षा शोधणार्यास संशोधकांना $31,337 जवळजवळ २५ लाख रुपये पर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. चला तर जाणून घेऊया गुगलचे Bug bounty program काय आहे. या बद्दल थोडीशी माहिती.
गुगल ने त्याच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर Vulnerability Rewards Program (OSS VRP) लाँच करताना सांगितले.
गेल्यावर्षी गुगलने ओपन सोर्स सप्लाय चेनला लक्ष करणाऱ्या हल्ल्यांमध्ये दरवर्षी 650 टक्क्यांनी वाढत पाहिली त्यामुळेच गुगलने स्वतःच्या Vulnerability Rewards Program संशोधकांना आता Bug शोधण्यासाठी पुरस्कृत केले जाऊ शकते ते संभाव्य पणे संपूर्ण open source ecosystem वर परिणाम करू शकतात.
Google ने सांगितले की त्याचा OSS VRP हा “जगभरातील Google चे वापरकर्ते आणि मुक्त स्रोत ग्राहक दोघांसाठी या प्रकारच्या हल्ल्यांपासून पुरवठा शृंखला सुरक्षित करण्यासह सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी आमच्या $10 अब्ज वचनबद्धतेचा भाग आहे”.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Bug Bounty Program हे एक आर्थिक बक्षीस आहे. जे सुरक्षा संशोधकांना हॅकर्सना सेवा किंवा ऑपरेटिंग सिस्टिम मधील सुरक्षा त्रुटी शोधण्यासाठी दिले जाते. हे कंपन्यांना काही विशिष्ट Bug शोधण्यासाठी मदत करते जो कोणी सॉफ्टवेअर rolled out होण्यापूर्वी चुकले असतील त्यांच्यासाठी त्या चुका शोधून काढण्यासाठी Google Bug Bounty Program लॉन्च केलेले आहे.