Dr. Babasaheb Ambedkar Marathi Bhashan 6 December 2022

Dr. Babasaheb Ambedkar Marathi Bhashan 6 December 2022 (Death Anniversary Speech in Marathi) #marathibhashan

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Dr. Babasaheb Ambedkar Marathi Bhashan 2022: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पुण्यतिथी 2022 भाषण” विषयी माहिती जाणून घेत आहोत. यावर्षी आपण “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 67वी पुण्यतिथी” साजरी करत आहोत त्यानिमित्त कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये तसेच पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी हे भाषण उपयोगी ठरेल.

आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची समृद्धता दाखवणे हे आम्हा भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या इतिहासात अनेक विरांच्या कथा आणि आपल्या देशासाठी त्यांचे योगदान हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशांमधील असाच एक नायक म्हणजे ‘डॉक्टर भीमराव आंबेडकर’ आपण सर्वजण त्यांना भारतीय ‘संविधानाचे जनक’ म्हणून ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते ते भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये अभिमानाने आणि सन्मानाने साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर २०२२ पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी केलेले भाषण आम्ही येथे सादर करत आहोत. हे भाषण पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे चला तर जाणून घेऊया ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2022 पुण्यतिथी भाषण’ कसे करावे या विषयी थोडीशी माहिती.

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.
  • त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र बी.ए केले.
  • कोलंबिया विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण घेतले.
  • 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी घेतली.
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 64 विषयांमध्ये पारंगत होते त्यांना अकरा भाषेचेही ज्ञान होते
  • शिक्षण पूर्ण करणारे ते पहिले दलित होते.

Dr. Babasaheb Ambedkar Marathi Bhashan 6 December 2022

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2022 पुण्यतिथी भाषण ची सुरुवात कशी करावी?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2022 पुण्यतिथी भाषण

आदरणीय
महोदय, प्राध्यापक, शिक्षक आणि माझा मित्र मैत्रिणिनो…

आज आपण येथे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2022 पुण्यतिथी” साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय ‘संविधानाचे जनक किंवा शिल्पकार’ म्हटले जाते. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे योगदान भारतासाठी खूप मोठे आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. दरवर्षी हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो.आपण सर्व त्यांना भारतीय ‘संविधानाचे जनक’ म्हणून ओळखतो पण त्यांचे योगदान एवढ्यापुरते मर्यादित नाही ते एक अतिशय प्रतिभावान व्यक्ती होते. ते राजकारणी, समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. भारतीय समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच लढा दिला. ते दलितांचे नेते होते.

1923 मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ ची स्थापना केली ज्याचा उद्देश शिक्षणाच्या महत्वाबद्दल जागरुकता पसरवने आणि आपल्या देशातील निम्न-वर्गीय लोकांची आर्थिक स्थिती वाढवणे होते.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या घोषणे खाली त्यांनी भारतातून जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक चळवळ देखील चालवली. सर्व मानवांच्या समानतेच्या नियमाचे पालन करून भारतीय समाजाचे पुनर्बांधणी करण्याची त्यांची इच्छा होती. 1927 मध्ये अस्पृश्य लोकांसाठी समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महाड, महाराष्ट्र येथे मोर्चाचे नेतृत्व केले. 1930 मध्ये त्यांनी ‘काळाराम मंदिर’ नाशिक महाराष्ट्र येथे मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व केले. ते वॉइस रॉय चे सदस्य देखील होते.

6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे ‘महापरिनिर्वाण’ झाले.

डॉ. भीमराव आंबेडकर यांना 1990 मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारतीय मजूर पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारत राजकीय पक्षही स्थापन केला. आपल्या देशातील तरुणांसाठी ते खरे प्रेरणास्थान आहेत आपण सर्वांनी त्यांचे आणि त्यांच्या महान तत्वज्ञानाचे पालन केले पाहिजेल एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद, जय भारत!

Mahaparinirvana Day: 6 December 2022

महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबर
6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या घरी झोपेतच निधन झाले.
6 डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘महापरिनिर्वाण’ दिवस म्हणून ओळखला जातो. 7 डिसेंबर रोजी दादर चौपाटी (बीच) चैतन्य भूमी येथे बौद्ध अंत्यसंस्काराचे आयोजन करण्यात आले त्यात लाखो शोकाकुल उपस्थित होते. आंबेडकरांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती ‘चैतन्य भूमी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. चैतन्य भूमी हे जगातील सर्व आंबेडकरी आणि बौद्धांचे श्रद्धास्थान आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री आणि इतर अनेक राजकारणी दरवर्षी सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात. चैतन्य भूमी वर आंबेडकरांचे स्मारक आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा दिला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Marathi Bhashan 6 December 2022

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group