दहीहंडीच्या शुभेच्छा 2022: Dahi Handi Wishes in Marathi (History, Significance) #dahihandi2022
दहीहंडीच्या शुभेच्छा 2022: Dahi Handi Wishes in Marathi
प्रेमाने श्रीकृष्णाचा जप करा. मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, कृष्ण उपासनेत लिन व्हा आणि त्यांच्या मोहिमेमुळे तुमचे जीवन आनंदी होईल. दहीहंडीच्या 2022 शुभेच्छा!
नटखट गोपाळा तुमचे जीवन सुख शांती आणि विपुलतेने भरून देईल त्यांच्या शिकवणीमुळे तुमच्या कृतींना प्रेरणा मिळेल आणि तुमचे जीवनातील अंतिम ध्येय तुम्ही गाठू शकाल. दहीहंडी 2022 च्या शुभेच्छा!
दहीहंडीच्या निमित्ताने भगवान कृष्ण आपल्या कुटुंबावर आपले प्रेम असेच निरंतर करत राहील. हॅपी जन्माष्टामी 2022
जन्माष्टमी हा मौजमजेचा, आनंदाचा आणि प्रेमाचा सोहळा आहे. तुम्हाला दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
या जन्माष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्ण तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला उदंड आनंद देवो. दहीहंडी 2022 च्या शुभेच्छा!
भगवान श्रीकृष्णाचे शूर पराक्रम तुम्हाला भविष्यात प्रत्येक समस्येला तोंड देण्याची प्रेरणा देतील तुमच्या कुटुंबाला सुख-समृद्धी मिळवो. जय श्री कृष्ण
या जन्माष्टमीला तुमचे जीवन प्रेम, शांती आणि समृद्धीने भरून जावो. तुम्हाला 2022 च्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
Dahi Handi 2022: Information in Marathi
दहीहंडी उत्सव 2022
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “दहीहंडी उत्सव 2022” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी कृष्णजन्म म्हणजेच जन्माष्टमी नंतर (गोपाळकाला) दहीहंडी साजरा केली जाते. चला तर जाणून घेऊया दहीहंडी का साजरी केली जाते? या विषयी थोडीशी रंजक माहिती.
Dahi Handi 2022: जन्माष्टमी हा हिंदूंचा खूप मोठा आणि मुख्य सण आहे. जो जगभरात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि दहीहंडी हा भगवान कृष्णाच्या बालपणाचा एक भाग मानला जातो. दहीहंडी हा एक हिंदू सण आहे जो जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्सवात आणि उत्साहाने साजरा केला जातो.
दहीहंडी उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील इतर राज्यांमध्ये आयोजित केला जातो.
दहीहंडी हा एक प्रसिद्ध सण आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो आणि त्यात लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. लोक मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करतात आणि दहीहंडीच्या विधीशिवाय हा उत्सव अपूर्ण असल्याची श्रद्धा आहे.
दहीहंडी 2022: इतिहास
हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या बालपणा लोणी म्हणजेच मक्खन दही आणि दूध आवडत असे. श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह शेजारी तसेच इतर गावकऱ्यांकडून हे लोणी चोरत असे त्यांच्या चोरीच्या सवयीची तक्रार करण्यासाठी गावकरी त्यांच्या आईकडे गेले तेव्हा कृष्णाच्या आईने गावकर्यांना सांगितले की त्यांनी बनवलेले लोणी हे एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवून लपवावे त्यामुळे कृष्ण तिथे पोहोचू शकत नाही पण हा विचार कामी आला नाही कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी हंडी पर्यंत पोहोचण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवण्यास सुरुवात केली तेव्हापासून गावकरी त्याला ‘मक्खन चोर’ म्हणू लागले.
दहीहंडी 2022: उत्सव
लोक दहीहंडीचे आयोजन करतात आणि उंचीवर ठेवलेले मातीचे भांडे फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात. लाखो भाविक दहीहंडी सहभागी होतात आणि त्यात फक्त मुलंच नाही तर मुलीही सहभागी होतात. दहीहंडी फोडताना लोक “हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की” असे म्हणतात.
जन्माष्टमीच्या दिवशी एकट्या मुंबई 4000 अधिक दहीहंडीचे आयोजन केले जातात आणि त्यातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘गिरगाव, दादर, परळ, वरळी आणि लालबाग’ येथे होत आहेत. covid-19 निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षात दहीहंडी मोठ्या व्यासपीठावर साजरी करण्यात आली नव्हती परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या वर्षी हा सण मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल असे सांगितले आहे.