भ्रष्टाचार मुक्त भारत मराठी भाषण – Corruption Free India Speech in Marathi (Bhrashtachar Mukt Bharat Bhashan Marathi) #marathibhashan
Corruption Free India Speech in Marathi
Bhrashtachar Mukt Bharat Bhashan Marathi: आजच्या मध्ये आपण “भ्रष्टाचार मुक्त भारत मराठी भाषण 2022” विषयी माहिती जाणून घेणार आहोत दरवर्षी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी युनायटेड नेशन आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करतो.
दरवर्षी शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये मुलांना भ्रष्टाचार विषयी जनजागृती करण्यासाठी त्यांचे शिक्षक काही विषय देतात त्यामध्ये ‘भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध मराठी’ हा एक विषय आहे. चला तर जाणून घेऊया भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध कसा लिहावा याविषयी थोडीशी माहिती सर्वप्रथम आपण जाणून घेऊया भ्रष्टाचार म्हणजे काय याविषयी माहिती.
मित्रांनो, तुम्हाला जर नाना पाटेकर यांचा ‘यशवंत’ हा चित्रपट माहिती असेल आणि तुम्ही तो बघितला असेल तर तुम्हाला यातील एक डायलॉग नक्की आठवत असेल “100 से 8 0 बेईमान फिर भी मेरा भारत महान” आज अशीच वेळ भारतावर आलेली आहे. भारतामधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने भ्रष्टाचार करत आहे किंवा भ्रष्टाचाराला पाठबळ देत आहे. जागतिक भ्रष्टाचार हा फक्त भारताला पडलेला प्रश्न नाही तर संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न आहे त्यामुळेच दरवर्षी युनायटेड नेशन ने 9 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिन’ म्हणून साजरा करतो या दिवशी भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती केली जाते संपूर्ण माहितीसाठी “आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2022” आर्टिकल वाचा.
भ्रष्टाचार म्हणजे काय?
भ्रष्टाचार म्हणजे काही प्रकारच्या लालचेच्या बदल्यात व्यक्ती किंवा समूहाने केलेल्या कोणत्याही कृतीचा संदर्भ. भ्रष्टाचार हा अप्रामाणिक आणि गुन्हेगारी कृत्य मानला जातो. भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास कायदेशीर शिक्षा होऊ शकते. अनेकदा भ्रष्टाचाराच्या कृतीमध्ये काही अधिकार आणि विशेष अधिकार समाविष्ट असतात. भ्रष्टाचाराची सर्व वैशिष्ट्ये आणि पैलू विचारात घेण्याचे व्याख्या शोधणे फार कठीण आहे. तथापि ही राष्ट्राचे जबाबदार नागरिक या नात्याने आपण सर्वांनी भ्रष्टाचार खरा अर्थ आणि त्याचा अप्रत्यक्ष स्वरूपातील प्रकटीकरण याबद्दल जागरूक असले पाहिजे जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्याला तो आढळतो तेव्हा आपण त्या विरुद्ध आवाज उठवून आणि न्यायासाठी लढू शकतो.
UN च्या मते भ्रष्टाचार हा एक गंभीर गुन्हा आहे. तो सर्व समाजातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला खीळ घालू शकतो कोणताही देश, प्रदेश किंवा समुदाय भ्रष्टाचारापासून मुक्त नाही. हे जगातील सर्व भागांमध्ये आढळतो मग ते राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक असो लोकशाही संस्थांना धोक्यात आणते आणि कमजोर करते सरकारी अस्थिरता हातभार लावते आणि आर्थिक विकास मंदावतो.
भ्रष्टाचार मुक्त भारत भाषणाची सुरुवात कशी करावी?
आदरणीय महोदय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझे मित्र मैत्रिणींनो…
आज आपण येथे “भ्रष्टाचार मुक्त भारत” कसा होईल याविषयी चर्चा करण्यासाठी येथे जमलो आहोत.
भ्रष्टाचार हा फक्त भारताला पडलेला प्रश्न नाही तर संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न आहे आणि याच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी दरवर्षी युनायटेड नेशन नऊ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणजेच इंटरनॅशनल अँटी करप्शन डे म्हणून साजरा करतो कारण की भ्रष्टाचार ही एकविसाव्या शतकातील सर्वात वेगाने वाढणारी समस्या आहे आणि ही समस्या हळूहळू देशाची आर्थिक विकासाला हानी पोहोचू लागली आहे. काही लोक म्हणतात की भ्रष्टाचार हा देशाला लागलेला आजार आहे आणि हा आजार बरा करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती केली जाते.
भारतामध्ये ही भ्रष्टाचाराचे प्रमाण भरपूर आहे कारण की येथील सरकारी नोकरदारांचे पगार कमी असल्यामुळे किंवा पैशांची हाव असल्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त आहे.
कोणीतरी म्हणूनच ठेवले आहे की भ्रष्टाचार हे गोड विषयासारखे असते.
जर आपल्याला भ्रष्टाचार मुक्त भारत हवा असेल तर आपल्याला काहीतरी मार्ग अवलंबण्याची गरज आहे भ्रष्टाचार कोकणाचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे सरकारी नोकरीत चांगला पगार देणे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना खूपच कमी पगार होतो त्यामुळे ते आपला खर्च भागवण्यासाठी लाखोरीचा अवलंब करतात त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळायला हवा परिणामी उच्च पगारामुळे त्यांची प्रेरणा कमी होईल आणि लाजखोरी कमी होईल.
कामगारांची संख्या वाढवणे हा भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा आणखी एक योग्य मार्ग असू शकतो अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कामाचा ताण जास्त असतो त्यामुळे सहकारी कर्मचाऱ्यांना कामाचा वेग कमी करण्याची संधी मिळते पण परिणामी हे कर्मचारी नंतर जलद काम वितरणाच्या बदल्यात लाज घेतात त्यामुळे सरकारी कार्यालयात अधिक कर्मचारी आणून लाज देण्याची संधी दूर करता येईल.
तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कायदे आणणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे तसेच लाच घेणाऱ्याला आणि लाच देणाऱ्याला कडक शिक्षा व्हायला हव्या.
कारण की भ्रष्टाचाराला कारणीभूत हा लाच देणारा आणि लाच घेणारा ही असतो.
तसेच कामाच्या ठिकाणी कॅमेरे लावणे हा भ्रष्टाचार रोखण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
सरकारने महागाई कमी ठेवायची हमी दिली पाहिजे किमती वाढल्याने अनेकांना आपले उत्पन्न कमी वाटू लागते त्यामुळे जनतेमध्ये भ्रष्टाचार वाढतो व्यापारी आपला मालाचा साठा चढत्या भावाने विकण्यासाठी भाव वाढवतात शिवाय राजकारणी त्यांना मिळणाऱ्या फायद्यांमुळे त्यांचे समर्थन करतात.
भ्रष्टाचार ही समाजाची मोठी दुष्काळी आहे ही दुष्टही समाजातून त्वरित दूर झाली पाहिजे भ्रष्टाचार हे आजकाल अनेकांच्या मनात शिरलेले विष आहे. सातत्यपूर्ण राजकीय आणि सामाजिक प्रयत्नाने आपण भ्रष्टाचारापासून मुक्त होऊ शकू अशी आशा आहे.
जेव्हा भ्रष्टाचार संपूर्णपणे संपुष्टात येईल तेव्हाच भारत देश म्हणून विकास आणि प्रगती करू शकले तरच आपण भारताला खऱ्या अर्थाने विकसित देश म्हणून शकेल आपण सर्वजण वेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याच्या या एकत्रित लढाईत एकत्र होऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. चला तर मग आपण पहिले पाऊल टाकू आणि सुरुवात करू स्वतः भ्रष्टाचारमुक्त होऊन. आपण भ्रष्टाचार मुक्त झालो की आपण इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करू शकतो आणि स्वतःसाठी क्रांती घडवून आणू. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद, जय भारत!
भ्रष्टाचार मुक्त भारत भाषण 2022 ची सुरुवात कशी करावी?
भ्रष्टाचार मुक्त भारत भाषण 2022 ची तयारी ‘आदरणीय महोदय, शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना’ या वाक्याने करावी.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो?
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
1 thought on “<strong>Corruption Free India Speech in Marathi</strong>”