बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?

आजच्या आर्टिकल मध्ये आपण बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे याबद्दल माहिती जाणून घेत आहोत.

बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?

दर वर्षी मे महिन्यामध्ये हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाची अशी मान्यता आहे कि भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता. गौतम बुद्धाचे खरे नाव हे सिद्धार्थ गौतम असे होते पुढे जाऊन त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि लोक त्यांना बुद्ध म्हणून संबोधू लागले. बुद्ध पौर्णिमा हा दिवस बुद्ध धर्म मानणाऱ्या लोकांचा विशेष दिवस असे म्हटले जाते कि भगवान बुद्धांचा जन्म आणि मृत्यू त्यांचा स्वयंवर आणि त्यांना ज्ञानप्राप्ती वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाली होती. यावर्षी 2021 रोजी 26 मे बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

बुद्ध पौर्णिमेचे महत्व

गौतम बुद्ध आणि त्यांच्या मृत्यू बद्दल बऱ्याच इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. तसेच काही इतिहासकारांचे मत आहे कि भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563-483 मध्ये झाला होता.
संपूर्ण जगामध्ये महात्मा बुद्ध यांना सत्याचा शोध लावल्याबद्दल ओळखले जाते त्यांनी मनुष्य जीवनामध्ये दुःख कसे दूर करावे याचा संदेश दिला होता. भगवान बुद्धांचा संदेश आज जगामध्ये पसरलेला आहे शांती आणि सुखाचा मार्ग ग्रहस्थ जीवनामध्ये कसा स्वीकारता येईल अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली त्यांचे अनुयायी संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. भगवान गौतम बुद्ध हे एक राजकुमार होते सत्याच्या शोधासाठी त्यांनी आपले राज्य त्याग केले आणि कठोर तपस्या करून बिहारमधील बोधगया येथे त्यांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाले.

बोधीवृक्षा चे महत्व

ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम यांनी आपला गृहत्याग केला तेव्हा त्यांनी कठोर तपस्या करून ज्ञान प्राप्त केले. ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी पिंपळाच्या झाडाची निवड केली आणि याच झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले.

ज्या वेळेस भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांच्या सेवेसाठी सुजाता नावाची एक मुलगी येत असे आणि सुजाता ने भगवान बुद्धांना “बुद्ध” म्हणून संबोधण्यास सुरुवात केली त्यांनीच या वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले होते त्यालासुद्धा तिनेच बोधीवृक्ष असे नाव दिले.

सध्या बोधीवृक्ष हे बिहारमधील बोधगया येथे आहे. पण हे बोधिवृक्ष भगवान बुद्धांनी तपास्या केलेले झाड नाही कारण की काही कट्टर धर्म पंथी जसे की मुगल यांनी या वृक्षाची कत्तल केली होती नंतर या झाडाच्या कलमा मधून हे झाड पुन्हा उभे राहिलेले आहे. सध्या हे झाड बिहारमधील बोधगया येथे आहे आणि या झाडाची पूजा करण्यासाठी देश-विदेशातून लोक येथे येतात.

बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते?

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बुद्ध पौर्णिमा ही साजरी केली जाते? काही लोक या दिवशी उपवास ठेवतात. काही लोक बुद्ध धर्माचे पठण करतात. काही राज्यांमध्ये बौद्ध धर्माचे रथयात्रा काढली जाते. भगवान बुद्ध हे शांततेचे प्रतीक आहेत त्यांचे विचार समाजाला एक नवी दिशा देणारी आहे. भगवान बुद्ध हे एक महान व्यक्ती होते त्यांनी समाजाला शांतता आणि दुःखातून दूर कसे रहावे याबद्दल शिकवण दिली होती.

भारता सोबतच श्रीलंका, नेपाळ, भूतान, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, म्यानमार, चीन, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आणि जपान या सारख्या देशांमध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली जाते.

Conclusion,
बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते? हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon